शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मापुसकर कुटुंब जपतंय स्वच्छतेचा वारसा!

By admin | Updated: February 6, 2017 06:11 IST

स्वच्छतेचा संदेश देण्यासह बायोगॅस प्रकल्पात काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. सुहास मापुसकर यांच्या कार्याचा वसा त्यांची कन्या आणि पुतणेदेखील जपत आहेत.

मंगेश पांडे , पिंपरीस्वच्छतेचा संदेश देण्यासह बायोगॅस प्रकल्पात काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. सुहास मापुसकर यांच्या कार्याचा वसा त्यांची कन्या आणि पुतणेदेखील जपत आहेत. युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांच्या आरोग्याबाबत डॉ. मापुसकरांचे वारस त्यांचे कार्य पुढे घेऊन जात आहेत. लहान मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, बालमृत्यूदर, मातामृत्यूदर कमी व्हावा यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील देहूतील डॉ. मापुसकर यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला. मापुसकर यांनी अनेक वर्षे आरोग्य व जनजागृतीबाबत काम केले. मानवी विष्ठेपासून बायोगॅसची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पातून स्वच्छता आणि आरोग्याचा संदेश दिला. या कामाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचाच वसा घेत डॉ. मापुसकर यांची कन्या शिल्पा नारायनण (मापुसकर) आणि पुतण्या उल्हास मापुसकर यांचे युनिसेफच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे. अप्पा पटवर्धन सफाई व पर्यावरण तंत्रनिकेतन या संस्थेच्या माध्यमातून काम सुरु आहे. बालमृत्यूदर, मातामृत्यू दर यांचे प्रमाण कमी करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरु आहेत. आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, अस्वच्छतेमुळे समस्या निर्माण होण्याऐवजी स्वच्छता राखल्यास कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, याबाबत जागृती करणे आदी कामकाज सुरु आहे. सध्या राज्यातील वीस जिल्ह्यांत युनिसेफच्या माध्यमातून अप्पा पटवर्धन सफाई व पर्यावरण तंत्रनिकेतन संस्थेचे काम सुरु आहे.