शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सलाईनवर

By admin | Updated: June 30, 2017 03:51 IST

महापालिका उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत सुरुवातीला जकात होता. जकातीला २०१३ मध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी)चा पर्याय देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत सुरुवातीला जकात होता. जकातीला २०१३ मध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी)चा पर्याय देण्यात आला. पिंपरी-चिंचवड औद्यागिक परिसरात छोटे मोठे कारखाने असल्याने जकातीचे उत्पन्न थेट महापालिकेच्या तिजोरीत पडत होते. मात्र, पाच वर्षांपासून महापालिकेतर्फे एलबीटीचा कर आकारला जात आहे. आता केंद्र शासनाने जीएसटी हा एकच कर आकारण्याचे धोरण निश्चित केले असल्यामुळे महापालिकेचा एलबीटी विभाग बंद होणार आहे. त्यामुळे या विभागातील ९५ कर्मचाऱ्यांना अन्यत्र वर्ग केले जाणार आहे. मात्र, महापालिकेला या पुढे निधीसाठी शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिकेच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात अपेक्षित जमा रकमेत एलबीटीपासून मिळणारे उत्पन्न पंधराशे कोटी गृहित धरले आहे. महापलिकेचे पाणीपट्टी, बांधकाम परवाना विभाग आणि मिळकत कर हे अन्य उत्पन्नाचे मार्ग आहेत. त्यातील मोठा उत्पन्नाचा वाटा जकात आणि नंतर एलबीटी विभागाचा होता. जकातीपोटी मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत पाच वर्षात मिळालेले एलबीटीचे उत्पन्न काही अंशी कमीच होते. मात्र, महापालिका अर्थसंकल्पात जमा रकमेच्या तपशिलात एलबीटी उत्पन्नाचा वाटा तब्बल ४९.३८ इतका होता. जवळ जवळ अर्थसंकल्पातील अर्धा उत्पन्नाचा भाग एलबीटीचा होता. महापालिकेतील एलबीटी विभागाचे ३० जूनला ‘शटर डाऊन’ होणार आहे. महापालिकेचे पाणीपट्टीचे उत्पन्न ६५ कोटी आहे. गुंतवणुकीवरील व्याजापोटी महापालिकेच्या तिजोरीत १३१ कोटी जमा होणार आहेत. बांधकाम परवानगीतून मिळणारे उत्पन्न २७९ कोटी ६० लाख इतके असेल. त्यातून अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पगार,भत्ते या करिता महापालिकेला आस्थापना खर्च ३५ टक्के करावा लागतो. मोठ्या प्रकल्पांची उभारणी, विविध विकास कामे करण्यासाठी महापालिकेला शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मनमानी कारभाराला अटकावमहापलिकेतील सत्ताधारी पक्ष कोणीही असो, आतापर्यंत त्यांना मनमानी कारभार करता येत होता. आता शासनाचा निधी थेट महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार नसल्याने आपोआपच मनमानी कारभाराला अटकाव बसणार आहे.