शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनास्थेमुळे महापालिकेची पिछाडी

By admin | Updated: May 5, 2017 02:51 IST

तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड

पिंपरी : तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेले आहे. गेल्या वर्षी देशात नवव्या आणि राज्यात पहिल्या असणाऱ्या शहराला देशात ७२ वा आणि राज्यात पाचवा क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिलेला आहे. स्वच्छ शहरांना प्रोत्साहान देण्यासाठी टॉप टेनमध्ये आलेल्या पालिकांचा गौरव करण्यात येतो. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या यादीतील टॉप टेनमध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आला होता. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या पिंपरी-चिंचवड पॅटर्नचा अभ्यास इतर शहरांनी केला होता. या स्पर्धेत एकूण साडेचारशे शहरे सहभागी झाली होती. स्वच्छ भारत आभियानात स्वच्छ भारत पुरस्कार सोहळ्याचे गुरुवारी नवी दिल्लीत वितरण झाले. यामध्ये महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकावर नवी मुंबई शहर आले असून, पिंपरी-चिंचवड पिछाडीवर गेले आहे. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी गेल्या वर्षी योग्य नियोजन केल्याने स्वच्छ शहरासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडने राज्यात मुसंडी मारली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी या अभियानाचे पथक आले. त्या वेळी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. प्रभागरचना आणि निवडणूक कामात व्यस्त असणाऱ्या महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासनाने याविषयी गांभीर्याने नियोजन केले नाही. परिणामी हागणदारी मुक्त आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी तयार केलेल्या ‘अ‍ॅप’कडे दुर्लक्ष झाल्याने गुण कमी मिळाले. दरम्यानच्या कालखंडात डॉ. यशवंत माने यांच्यावर निवडणुकीसह आरोग्य विभागाची जबाबदारी होती. स्वच्छता विभागासाठी स्वतंत्र अधिकारी नव्हता. परिणामी गुणांमध्ये घट झाली. (प्रतिनिधी)गुणांक झाले कमी स्वच्छ स्पर्धेबाबत लक्ष न दिल्याने गुणांकनात शहर पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे देशातील टॉप टेनची पंरपरा खंडित झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत दोन हजार गुणांपैकी १७०० गुण मिळवून महापालिकेचा देशात पहिल्या नऊ शहरांमध्ये नंबर आला होता. या वर्षी झालेल्या स्पर्धेत १३२० गुण मिळाले आहेत. ३८० गुणांनी शहर पिछाडीवर गेले आहे. हागणदारी मुक्त आणि उपाययोजनांसाठी दीडशे गुण होते. तसेच स्वच्छतेविषयीच्या राबविण्यात येणाऱ्या अ‍ॅप संदर्भातील उपाययोजना यासही गुण होते. या दोन्ही गोष्टीत महापालिकेला गुण मिळालेले नाहीत.