शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिटी ट्रान्स्फर्मेशनसाठी महापालिका कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 03:22 IST

शहर परिवर्तन करण्यासाठी महापालिका नियोजन करीत आहे. त्याबाबत महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाची माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी - शहर परिवर्तन करण्यासाठी महापालिका नियोजन करीत आहे. त्याबाबत महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाची माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. सूचनांविषयीच्या सर्वेक्षणास अल्प प्रतिसाद मिळाला असून, या कार्यालयावर कोट्यवधींचा खर्च केला जात असताना सर्वेक्षणास आता महापालिका कर्मचाºयांना जुंपले जाणार आहे.सिटी ट्रान्स्फर्मेशन आॅफिसच्या कामकाजाची माहिती माध्यमांना देण्यासाठी महापालिकेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहायक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनीच या प्रकल्पांची माहिती दिली. हर्डीकर म्हणाले, ‘‘शहराचा चेहरा बदलून शहराची एक विशेष ओळख निर्माण करणे. जगासाठी एक शहर म्हणून केवळ काम करणे नव्हे, तर जग ओळखेल असे शहर तयार करणे हे महापालिकेचे नवीन उद्दिष्ट आहे. सिटी ट्रान्स्फर्मेशनचे उद्दिष्ट साधण्याकरिता सिटी ट्रान्स्फर्मेशन आॅफिस कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.’’सिटी ट्रान्स्फर्मेशनचे काम करणाºया सल्लागार संस्थेच्या प्रतिनिधींनी केवळ तीन मिनिटांत इंग्रजीत सादरीकरण केले. त्याचे भाषांतर आयुक्तांनी मराठीत केले. आयुक्तांनीच सल्लागार संस्था किती अनुभवी आहे, असे गोडवे गायले.१सर्वेक्षण करण्याची जबाबदारी खासगी सल्लागार संस्थेची आहे. तीन आठवड्यांत केवळ ३०३५ जणांचे सर्वेक्षण झाले आहे. सिटी ट्रान्स्फर्मेशनसाठी महापालिका वर्षाला साडेसात कोटी रुपये खर्च करीत असताना सल्लागार संस्थेचे काम महापालिका कर्मचाºयांकडून करवून घेतले जाणार आहे.२महापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज ९५६ भरले असून, सीएफसीकडून ८५८, करसंकलन कार्यालयातून ३१, एका वृत्तपत्रासंबंधित दोन संस्थांकडून १३२० अर्ज भरून घेतले आहेत. अर्ज भरण्यासाठी महापालिका कर्मचाºयांना राबवून घेणारआहे. या कामासाठी लाखोंचाखर्च होणार आहे. अर्जांची सत्त्यता कशी तपासणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या