शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या तोंडावर एमएसआरडीसीचा सर्वसामान्यांच्या पोटावर हातोडा

By admin | Updated: October 20, 2016 16:55 IST

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या दुतर्फा टपर्‍या, हातगाड्या लावत पोटाची खळगी भरणार्‍यांवर महाराष्ट्र शासनाच्या रस्ते विकास महामंडळाने

ऑनलाइन लोकमतलोणावळा : दि. २० (वार्ताहर) - मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या दुतर्फा टपर्‍या, हातगाड्या लावत पोटाची खळगी भरणार्‍यांवर महाराष्ट्र शासनाच्या रस्ते विकास महामंडळाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कारवाई करत त्याच्या पोटावर हातोडा मारला आहे. हे करत असताना संबंधित अधिकार्‍यांनी मोठ्या व्यावसायकांना मात्र अभय दिल्याने अधिकार्‍यांच्या हेतू विषयी संशय व्यक्त होऊ लागला आहे. बुधवारी दि. १९ रोजी ही कारवाई करण्यात आली.मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ चे रुंदीकरण प्रस्तावित असले तरी अद्याप शासनाकडून खाजगी जागा धारकांशी जागा आरक्षित करणे, चर्चा करुन मोबदला देणे व अन्य बाबीं संदर्भात कसलाही पत्रव्यावहार झाला नसताना अनेकांना जागा खाली करण्याच्या नोटिसा एमएसआरडीसीने बजावल्या आहेत. नागरी वस्ती असणार्‍या भागात जादा अंतर आरक्षित करणार असल्याचे दाखवत मोकळ्या जागांमध्ये कमी अंतर दाखवत मोठ्या व्यावसायकांच्या जागा वाचविण्याचा खटाटोप एमएसआरडीसी कडून सुरु असून ग्रामस्तांनी याला तिव्र विरोध दर्शविला आहे. बुधवारी वलवण महाविद्यालय ते लोणावळा दरम्यान एमएसआरडीसी ने अतिक्रमण विरोधी कारवाई राबवत अनेक टपर्‍या, हातगाड्या, शेड व जाहिरातीचे बोर्ड काढले, काही संरक्षण भिंती काढल्या मात्र हे करत असताना पक्षपातीपणा करत काही व्यावसायकांना अभय दिल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक वाहतुक कोंडी ही झालावाडी ते अंबरवाडी गणपती मंदिर रस्ता, गवळीवाडा या परिसरात होत असताना त्याठिकाणी मात्र रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्याचे धारिष्ठ हे अधिकारी दाखवत नाही. गवळीवाडा परिसरात सर्वच व्यावसायकांनी रस्त्याच्या गटारांपर्यत दुकाने व हाँटेल थाटली असताना व खरी वाहतुक कोंडी या भागात होत असताना रस्ते विकास महामंडळ तेथे सर्वावर अर्थपुर्ण मेहेरबान असून गोरगरिबांवर मात्र जेसेबी व बुलडोझर फिरवू पहात आहे.रस्ता रुंदीकरणात देखिल पक्षपातीपणामुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ च्या रुंदीकरणासाठी वाहतुक कोंडी होत असलेल्या लोणावळा शहरात २५ मिटर अंतर व ग्रामीण भागात ७० मिटर अंतर दर्शविण्यात आले असल्याने ग्रामीण भागातील नागरिक‍ांनी याला विरोध दर्शविला असून पक्षपातीपणा करणार असाल तर रुंदीकरणासाठी इंचभर जागा देखिल जास्त देणार नाही असा इशारा रस्ते विकास महामंडळाला दिला आहे. रस्ते विकास मंडळाने ग्रामीण भागात जाणिवपुर्वक नागरीवस्ती असणार्‍या बाजुला जादा जागा दाखवत गावं उध्दवस्त करण्याचे धोरण आखल्याने नागरिकांनी या रुंदीकरणाला विरोध दाखविला आहे. शहरात २५ मिटर अंतर असेल तर गग्रामीण भागात देखिल २५ मिटर अंतर करा ही वरसोली, वाकसई, कार्ला आदी ग्रामस्तांची मागणी आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनी प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाबाबत अद्याप आमच्या कार्यालयाकडे कसलिही माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी पत्र वाकसई ग्रामपंचायतीला दिले आहे.अतिक्रमण वाढायला अधिकारी जबाबदाररस्त्याच्या दुतर्फा आज जे अतिक्रमण वाढलेले दिसत आहे, त्याला संबंधित अधिकार्‍यांचे अर्थपुर्ण संबंध व लाचखोरी जबाबदार आहे. ज्यावेळी ही अतिक्रमणे होत असतात त्यावेळी व्यावसायकांकडून चिरिमिरी घेत हे अधिकारी गप्प बसतात यामुळे रस्त्याच्या कडेने अतिक्रमणे वाढली आहेत. वेळीच यावर रोख लावला असता तर आज अतिक्रमणे पाडण्याची वेळच आली नसती अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.