शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खिळेमुक्त झाडे अभियानाची झाली चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:37 IST

मागील चार महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड भागात खिळेमुक्त झाडे अभियानाने यशस्वीपणे जोर धरला आहे. याचाच एक भाग म्हणजे ‘अंघोळीची गोळी’ आणि ‘शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने गिरिराज हौसिंग सोसायटी, बिजलीनगर येथे ‘खिळेमुक्त झाडे’ उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

पिंपरी - मागील चार महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड भागात खिळेमुक्त झाडे अभियानाने यशस्वीपणे जोर धरला आहे. याचाच एक भाग म्हणजे ‘अंघोळीची गोळी’ आणि ‘शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने गिरिराज हौसिंग सोसायटी, बिजलीनगर येथे ‘खिळेमुक्त झाडे’ उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.शहर परिसरात ही खिळेमुक्त झाडे अभियानाची चौथी शाखा आहे. निगडी, संभाजीनगर, थेरगाव यानंतर बिजलीनगर येथेही सुरू झालेले हे अभियान संपूर्ण बिजलीनगर येथील झाडे खिळेमुक्त, कचरामुक्त आणि आळीयुक्त करूनच पूर्ण होईल. या उपक्रमांतर्गत पर्यावरण रक्षण करणाऱ्या निसर्गप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. येथील सहभागी नागरिकांनी असंख्य झाडांना वेदनामुक्त केले.निगडी प्राधिकरण परिसरामध्ये खिळेमुक्त झाड हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून अनेक झाडांचे खिळे काढण्यात आले. झाडांना मोकळा श्वास घेता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले.अनेक ठिकाणी झाडांवर जाहिरात फलक लावण्याचे फॅड वाढले आहेत. बºयाच वेळा फलक काढले जातात परंतु झाडे खिळेमुक्त केले जात नाहीत. त्यामुळे झाडांचे आयुर्मान कमी होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होत होता. याची दखल घेऊन अनेक संघटनांनी खिळेमुक्त झाड हा उपक्रम सुरू केला. निगडी, संभाजीनगर, थेरगाव यानंतर बिजलीनगर येथेही सुरू झालेले हे अभियान संपूर्ण बिजलीनगर येथील झाडे खिळेमुक्त, कचरामुक्त आणि आळीयुक्त करूनच पूर्ण होईल, असे यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी सांगितले.या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघ, बिजलीनगर हास्य क्लब या सहकारी सामाजिक संस्थांनी आपला कृतिशील सहभाग नोंदविला.या वेळी ‘अ’ प्रभाग कार्यालयाच्या अध्यक्षा नगरसेविका अनुराधा गोरखे, ‘ब’ प्रभाग कार्यालयाच्या अध्यक्षा व स्थायी समिती सदस्य करुणा चिंचवडे, नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, शेखर चिंचवडे, व्यापारी आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, प्रभाग अधिकारी संदीप खोत, आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, आनंद पानसे, केतकी नायडू, प्राजक्ता रुद्रवार, मनीषा शिंदे, उल्हास टकले, प्रतापसिंग पाटील, रोहित शेणॉय, सिकंदर घोडके, राहुल धनवे, गणेश बोरा आदी उपस्थित होते.शहरात पवना नदी जलपर्णीमुक्त करण्याचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. त्यामध्येही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. तसेच विविध संघटनांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये अनेक समाजोपयोगी कामे केली जात आहेत. त्यामुळे शहरात पर्यावरणाचे संतुलन रहात आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.एक झाड टिकल्यामुळे तेथील जैव-विविधता टिकून राहते. तेथे अनेक पक्षी, प्राणी येतात आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे ट्री अ‍ॅक्ट १९७५ नुसार झाडांवर जाहिरात ठोकणाºयावर आणि संबंधित जाहिरात मालकावर येथून पुढे गुन्हे दाखल केले जातील. तसेच ‘ब’ प्रभागातील झाडांवर खिळे ठोकून झाडांना विद्रूप करणाºया आणि त्यांना नुकसान पोहोचवणाºया प्रत्येकावर कडक आणि दंडात्मक कायदेशीर कारवाई केली जाईल वेळ प्रसंगी खटलाही भरला जाईल.- करुणा चिंचवडे, ब प्रभाग अध्यक्षा

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या