शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

‘युरो स्कूल’ची मान्यता रद्दच्या हालचाली

By admin | Updated: April 6, 2016 01:19 IST

येथील युरो किड्स शाळा व्यवस्थापनाकडून सातत्याने होणाऱ्या मनमानी कारभारामुळे शाळा व्यवस्थापन व त्रस्त पालक यांच्यात सुरू असलेला वाद चांगलाच पेटला आहे.

वाकड : येथील युरो किड्स शाळा व्यवस्थापनाकडून सातत्याने होणाऱ्या मनमानी कारभारामुळे शाळा व्यवस्थापन व त्रस्त पालक यांच्यात सुरू असलेला वाद चांगलाच पेटला आहे. नियमांची पर्वा न करता, पालकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अतिरिक्त फी न भरल्याच्या कारणावरून सुमारे १७ विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले. तर दोघांना डांबून ठेवण्यात आल्याने पालकांनी शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. युवा सेनेने शाळेचा निषेध करीत घोषणाबाजी केली. युरो स्कूलमध्ये विनाकल्पना वाढविलेली फी न भरल्याने विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढल्याने काही दिवसांपूर्वी पालकांचा वाद झाला होता. तेव्हा शाळेने उद्दामपणा करीत पालकांचे कुठलेही म्हणणे न ऐकता अनुभा सहाय यांच्यासह अनेक पालकांवर गुन्हे दाखल केले होते. तर आता थेट दाखले हातात देणे अन् विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतप्त पालकांनी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाकड पोलिसांकडे करीत आहेत. फी वाढ रोखणे, शाळेची एनओसी, बोर्ड आदी मागण्यांबाबत पालक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर सकाळपासूनच जमले होते. त्यातच युवा सेनेचे युवा अधिकारी राकेश वाकुर्डे, समन्वयक विशाल कलाटे, संजय संधू, अलन पंडित यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलत गोंधळ सुरू केल्याने शाळा परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. शालेय व बसची फी, शैक्षणिक शुल्क न भरल्याचा शेरा मारून व्यवस्थापनाने शाळा सोडल्याचा दाखलाच पालकांच्या हाती दिल्याने पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. शिक्षण हक्क कायद्यानुसार काही पालकांनी फी भरण्याची तयारी दर्शवत धनादेशासह ते शाळा आवारात दाखल झाले. मात्र, त्यांची पुन्हा फिरवाफिरवी केल्याने शाळा व्यवस्थापनाकडून मनमानी पद्धतीने तीन वर्षांच्या आत म्हणजे प्रत्येक वर्षी वाढीव फीची मागणी होत असल्याने कुठलीही बेकायदेशीर फी भरणार नसल्याचेही पालक अभिलाषा मुकीम,अनुराधा पांडे, पुनित गुप्ता, नीतेश बोरीकर, अनुभा सहाय यांच्यासह अन्य पालकांनी ठामपणे सांगितले.या शाळेला शिक्षण विभागाची कुठलीही ना हरकत प्रमाणपत्र नसताना बेकायदेशीरपणे ही शाळा सुरू आहे. शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आयसीएसईची मान्यता असल्याची भुरळ पालकांना घातली. वास्तविक माहिती अधिकार कायद्यानुसार अशी कोणतीही मान्यता या शाळेला मिळाली नसल्याचे पालकांनी सांगितले. दरम्यान, शिक्षण विभागाचे उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी अरुण आत्तार व महापालिकेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी शाळेला भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली. (वार्ताहर)