देऊळगावराजे : बोरीबेल (ता. दौंड) येथील संभाजी गावडे याच्या शेतातील विहिरीवरील ३ एचपीची व ५ एचपीची मोटार चोरून नेल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार गोपाळ ओमासे यांनी दिली.याप्रकरणी गणेश राजेंद्र मोरे, तात्या अशोक जगताप (दोघे रा. बोरीबेल) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी गावडे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्याच्या लक्षात आले, की विहिरीवरील तीन एचपीची मोटार कुणीतरी चोरून नेली. शेतीला पाणी देण्याचे महत्त्वाचे असल्याने लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी ५ एचपीची मोटार आणून पाणी भरण्याचे काम चालू केले. परंतु दुसऱ्या दिवशी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेले असता तीही मोटार चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यामुळे आजूबाजूला पाहिले असता त्यांना मोटारही पोपट किसन जाधव व सचिन जहाँगिरे यांच्या शेतातील ओढ्याच्या कडेला पडलेली दिसली. त्यांनी ही सर्व हकिकत आपल्या मुलाला सांगितली व त्यांनी मोटार कोण घेऊन जातो, हे लक्ष ठेवून राहिले. दोन दिवसांनी ती मोटार गणेश राजेंद्र मोरे, तात्या अशोक जगताप (दोघे रा. बोरीबेल) या दोघांनी उचलून नेताना यांना पाहिले. त्यावरून या दोन्ही मोटार यांनीच चोरून नेल्याने दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
बोरीबेलला मोटार चोरी; दोघांवर गुन्हा
By admin | Updated: December 22, 2016 01:50 IST