शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:08 IST

प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष : मांजामुळे अनेक निष्पापांचा नाहक बळी; पक्ष्यांच्याही जीविताला धोका

पिंपरी : वेळ दुपारी साडेतीनची... ठिकाण पिंपरी-चिंचवडमधील अजमेरा येथील एक दुकान... पतंग व मांजा मिळेल का, या प्रश्नावर दुकानदार म्हणाला, ‘हो कसा पाहिजे?’ ‘मांजा चांगल्या दर्जाचा पाहिजे.’ सुरुवातीला मांजाचे दोन-तीन प्रकार दाखवण्यात आले. ‘न तुटणारा मांजा पाहिजे आहे. चिनी मांजा आहे का?’ ‘हो. हा चिनी व नॉयलान मिक्स असा मांजा आहे,’ असे दुकानदाराने सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरात चिनी मांजा विक्री होत आहे का, याबाबत ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. या वेळी चिनी मांजाची शहरात सर्रास विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याची प्रथा आहे. पतंग उडविण्यासाठी चिनी, नायलॉन आणि सिंथेटिक मांजा वापरण्याकडे कल वाढला आहे. मात्र या मांजामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, पक्ष्यांनाही जीव गमवावा लागत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे अशा घातक मांजावर बंदी आहे. असे असतानाही काही विक्रेते या घातक मांजाची सर्रास विक्री करीत आहेत. महापालिका आणि संबंधित प्रशासनाने बंदीची अंमलबजावणी केली नसल्याने अशा विक्रेत्यांचे फावले आहे. कारवाई होत नसल्याने अशा मांजाची खुलेआम विक्री होत आहे. पिंपरी येथील काही विक्रेत्यांनी नायलॉन मांजा विक्रीसाठी दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात ठेवला आहे. मात्र, त्याला चिनी मांजा न म्हणता टिकाऊ असल्याचे सांगितले जात आहे.मुलांची चिनी मांजालाच पसंतीदुकानाच्या बाहेर साधा मांजा लावतात. ग्राहकांनी मागणी केली की, चिनी व नायलॉन मांजा देतात व कोठेही याबद्दल माहिती सांगू नका, असे दुकानदारांकडून सांगण्यात येते. बंदी असतानाही शहरात चिनी व नायलॉन मांजा कुठून येतो, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. चिनी मांजाच्या एका रिळाची किंमत १६० रुपये आहे. लहान मुलेदेखील अशा घातक मांजाची खरेदी करतात. पतंग उडविताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने अशा मांजामुळे लहान मुलांचे हात कापण्याचे व अपघाताचे प्रकार सातत्याने घडत आहे, असे असतानाही ग्राहकांकडून अशा मांजाला मोठी मागणी आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे.

टॅग्स :chinaचीनkiteपतंग