शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री

By admin | Updated: December 26, 2016 03:08 IST

शहरातील बहुतेक शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री सुरू असून, अनेक अल्पवयीन विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

कामशेत : शहरातील बहुतेक शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री सुरू असून, अनेक अल्पवयीन विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. कामशेत शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने तसेच टपऱ्या आहेत. कामशेत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये शाळा परिसरात ठरावीक अंतरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदीचे ठराव अनेकदा झाले. मात्र, या दुकान व टपरी चालकांवर आतापर्यंत कोणतीच कारवाई न झाल्याने ते राजरोसपणे या पदार्थांची विक्री करीत आहेत. त्यांना कोणाचीच भीती राहिली नसल्याचे बोलले जात आहे. शहरातील शाळा परिसरात सर्रास या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याने अनेक अल्पवयीन विद्यार्थी मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे. राज्यात गुटखाबंदी असूनही शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. मावळातील अनेक दुकानदार शहरातून होलसेल भावात गुटखा विकत घेऊन दुप्पट किमतीला विकत आहेत. या सर्व प्रकाराकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ नसल्याने या विक्रेत्यांचे फावले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात सर्वकाही सोपे व जवळ आल्याने त्याचा सर्वांना फायदा होत असला, तरी तोटेही अनेक असल्याचे दिसत आहेत. फोर जी व थ्री जी फोनच्या जमान्यात, तसेच सिनेमातून दाखवण्यात येणाऱ्या दृष्यांमुळे अनेक अल्पवयीन मुले भारावून जात असून सिनेमातल्या नायकाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल वाढतो. अनेक मुले तसे वागतानाही दिसत आहेत. गुटखा खाणे, सिगारेट पिणे म्हणजे वयाने मोठे झाल्याचे लक्षण समजून अनेक अल्पवयीन मुले या व्यसनांच्या आहारी जात आहेत. शहरातील अनेक तंबाखूजन्य पदार्थ गुटखा विक्री दुकानात व टपऱ्यांवर अल्पवयीन मुलांचा वावर वाढला असून, सिगारेट पिणे म्हणजे त्यांना मोठेपणाचे वाटते आहे. संबंधित प्रशासनाने शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्ण बंदी घालून या दुकानदार व टपऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालक करीत आहेत. (वार्ताहर)