शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाचा मांजा अडकून स्फोट

By admin | Updated: January 26, 2017 00:27 IST

पडवळनगर, थेरगाव येथील प्रजापती चाळीत घराच्या टेरेसवरून पतंग उडवताना मांजा उच्च दाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकला

पिंपरी : पडवळनगर, थेरगाव येथील प्रजापती चाळीत घराच्या टेरेसवरून पतंग उडवताना मांजा उच्च दाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकला. अतिउच्च दाबाच्या विद्युतवाहक तारांच्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. त्या स्फोटाच्या ठिणग्या उडून त्यात तीन मुले भाजून जखमी झाली. त्यातील अक्षय प्रजापती हा ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षय, आर्यन पांडे व आकाश हे तिघे सकाळी ११च्या सुमारास घरासमोरील टेरेसवरून पतंग उडवत होते. मांजा इमारतीवरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकला. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. त्यात अक्षयसह दोन मुले जखमी झाली आहेत. अक्षय गंभीर भाजल्याने त्याला तातडीने पुण्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मांजा अडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. तसेच मांज्यामुळे कापून जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु पतंगाच्या मांज्याने विद्युततारांचा स्फोट होऊन दुर्घटना घडण्याची ही पहिलीच घटना आहे.तीन मुले भाजून जखमी झाली. शिवाय चाळीतील काही रहिवाशांच्या घरातील विद्युत मीटरही जळाले. दूरचित्रवाणी संच, तर काहींच्या इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. काहींच्या घरातील साहित्य खाक झाले. घरासमोर सुकविण्यासाठी घातलेले कपडे, गाद्या, त्याचबरोबर इमारतीतील सर्व सदनिकांचे विद्युत मीटर जळाले. तीन वर्षांपूर्वी थेरगाव, डांगे चौकात अशीच दुर्घटना घडली होती. टीव्ही केबल विद्युत खांबावरून नेल्याने शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत एक मुलगा दगावला होता. (प्रतिनिधी)