शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तुटीच्या अर्थसंकल्पाची ओढवणार नामुष्की?

By admin | Updated: January 23, 2016 02:28 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेला २०१५-१६ या आर्थिक वर्षात २ हजार ३१५ कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. मात्र, वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला २०१५-१६ या आर्थिक वर्षात २ हजार ३१५ कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. मात्र, वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना अद्यापपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत १ हजार ६२९ कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे आणखी सातशे कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे, असे न झाल्यास तुटीचे अंदाजपत्रक सादर करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळकत कर वसुलीत पीछेहाट, एलबीटी अनुदानात कपात, पाणीपट्टीची थकबाकी यांमुळे अपेक्षित रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होत नाही. तर दुसरीकडे विकासकामे राबविण्याच्या नावाखाली घेण्यात येणारी कोटीच्या कोटी उड्डाणामुळे महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. महापालिकेने या आर्थिक वर्षात २ हजार ३१५ कोटी रुपये जमेचा अंदाज धरला होता. मात्र, विविध कारणास्तव ही रक्कम वसूल करण्यात प्रशासनाला अपयश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील वर्षातील अंदाजपत्रक तुटीचे सादर करण्याची वेळ येते की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या आर्थिक वर्षात स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून आत्तापर्यंत १ हजार चाळीस कोटी ९७ लाख रुपये जमा झाले आहेत. तर करसंकलन विभागात २४० कोटी ५७ लाख, तर लेखा विभागातून ३३ कोटी ४४ लाख ७६ हजार जमा झाले आहेत. भांडवली जमा ४० कोटी ४८ लाख ६७ हजार इतकी आहे. इतर २७ कोटी ९३ लाख ४१ हजार रुपये जमा आहेत. एलबीटीच्या बदल्यात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात शासनाने कपात केली. यामुळे महापालिकेला निधीची कमतरता भासणार आहे. दरमहा शासनाकडून ६६ कोटींचे अनुदान मिळत होते. यामध्ये १९ कोटींनी कपात केल्याने आता केवळ ४७ कोटी रुपये मिळणार आहेत. मिळकत कराच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात ५१७ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी पावणेतीनशे कोटी वसूल झाले. उर्वरित अडीचशे कोटींच्या वसुली पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. पाणीपट्टीची ३१ मार्च २०१४अखेर ४५ कोटींची असलेली थकबाकी मार्च २०१५अखेर ४१ कोटी होती. ही थकबाकी वसूल करणेही गरजेचे बनले आहे. महापालिकेच्या यंत्रणेला वसुलीसाठी कंबर कसावी लागणार आहे. (प्रतिनिधी)