शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

निगडीपर्यंत मेट्रो?

By admin | Updated: October 15, 2016 03:08 IST

पुणे मेट्रो प्रकल्पाला सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला

पिंपरी : पुणे मेट्रो प्रकल्पाला सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचा कॉरिडोर दापोडी ते पिंपरीऐवजी निगडीपर्यंत असावा, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे. दरम्यान, यासाठी प्रयत्नशील असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. या प्रकल्पाला सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिली असून, आता केवळ केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यास प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. याबाबत आयुक्त म्हणाले की, मेट्रोच्या चार कॉरिडोरपैकी एक कॉरिडोर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. तो दापोडी ते पिंपरी असा आहे. मात्र, नागरिकांची मागणी आहे की, हा कॉरिडोर निगडीपर्यंत असावा. त्यामुळे या प्रकल्पात निगडीपर्यंतच्या कॉरिडोरचा समावेश केल्यास अधिक फायदेशीर होईल. प्रकल्पासाठीचा महापालिकेचा हिस्सा निश्चित झालेला नाही. किती हिस्सा द्यायचा, याबाबत जो निर्णय घेतला जाईल, तो महासभेच्या मान्यतेने द्यावा लागेल. (प्रतिनिधी)