शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

आयुक्तांच्या घरच्या देखाव्यातून पर्यावरण रक्षण व कलासंवर्धनाचा संदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 19:09 IST

शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.

ठळक मुद्देविविध कला साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविणारी आकर्षक सजावट

विश्वास मोरे पिंपरी : गणेशोत्सवात घरगुती गणपतीस आकर्षक सजावट केली जाते. पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बाप्पांना आकर्षक सजावट केली आहे. कला आणि विद्येची देवता असलेल्या बाप्पांसमोर विविध कला साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविणारी आकर्षक सजावट केली आहे. अभिजात शास्त्रीय संगीतातील संवादिनी अर्थात हार्मोनियम, तबला, तंबोरा आणि विविध पुस्तकांचा वापर केला आहे. परंपरा जपण्याबरोबरच पर्यावरण, कला संवर्धनाचा संदेश दिला आहे.कला अधिपती गणरायाचे आगमन झाले आहे. शहर गणेशमय झाले आहे. नेत्रदीपक सजावटी आणि रोषणाई लक्ष वेधून घेत आहे. शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. हर्डीकर आणि आदिती हर्डीकर हे दाम्पत्य हे कलाप्रेमी आहे. जेथे नियुक्तीवर असतील त्या ठिकाणी आयुक्त हे गणरायाची प्रतिष्ठापना करतात. पाच दिवस मनाभावे सेवा केली जाते. तसेच दरवर्षी बाप्पांसमोर  वेगवेगळी आकर्षक अशी आरास केली जाते. यंदा गणपतीसमोर पर्यावरणपूरक कलांसंस्कृतीचे दर्शन घडविणारी सजावट केली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, गणपती ही कलेची देवता आहे. त्यामुळे कलांची आरास तयार केली आहे. दरवर्षी आमच्या घरी गणपती बसविला जातो. यंदा पर्यावरणपूरक आरास तयार केली आहे.सर्वसाधारणपणे गणपतीच्या आरास करण्यासाठी थर्मोकॉल वापरले जाते. मात्र, आरास करण्यासाठी १९९२ पासून थर्मोकॉलचा वापर बंद केला आहे. तर १९९१ पासून गणपतीचे विर्सजन करण्याचे बंद केले आहे. देव्हा-यातीलच मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. घरामध्येच पाण्यात विसर्जित केले जाते आणि पुन्हा ती मूर्ती देव्हा-यात ठेवली जाते. गणपतीनिमित्त दरवर्षी वेगवेगळी थिम घेऊन आरास केली जाते. यंदा कलांचा अधिपती ही संकल्पना घेतली आहे. नागरिकांनीही पर्यावरणपूरक असा उत्सव साजरा करण्यावर भर द्यायला हवा. ..................कलाअधिपती बाप्पांना भेट गणराय हे कलांचे अधिपती. त्यामुळे आयुक्तांनी कलांचा अधिपती ही संकल्पना घेतली आहे. सजावटीत विविध कला आणि त्यांच्यासंबंधितील साहित्य मांडले आहे. भारतीय अभिजात संगीताची वाद्ये, लेखन साहित्य, पॉटरी, पेटिंग, फोटोग्राफी, ग्लासवर्क, घुंगरु, सावंतवाडीतील लाकडी खेळणी, पुस्तके, कवितासंग्रह, कागद असे बरेच कला साहित्य ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcommissionerआयुक्तGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८