शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणा आहे; मनुष्यबळ कमी!

By admin | Updated: February 29, 2016 00:56 IST

महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहनांसह इतर यंत्रणा असली, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्या यंत्रणेचा उपयोग होत नाही.

पिंपरी : महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहनांसह इतर यंत्रणा असली, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्या यंत्रणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ १७७ चौरस किलोमीटर असून, शहराची लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे, तर शहरात सुमारे सात हजार उद्योग-धंदे आहेत. कुदळवाडी, भोसरी, चिंंचवडसह शहराच्या विविध भागांत छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत असतात. त्यामुळे महापालिकेची अग्निशामक यंत्रणाही तितकीच सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, इतक्या मोठ्या शहरात आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी केवळ चार अग्निशामक केंदे्रआहेत. त्यामुळे केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त अवधी लागतो. यामुळे घटनेची गांभीर्यता वाढू शकते. त्यामुळे केंद्रांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. दरम्यान, आणखी आठ केंद्र उभारण्याची मागणी होत आहे. यासह मनुष्यबळही अपुरे पडत आहे. सध्या अधिकारी व कर्मचारी मिळून १३० जण आहेत. यासह आणखी दीडशे कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. मात्र, त्या तुलनेत कर्मचारी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनचालक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत; तर अनेक कर्मचारी असे आहेत की, वयोमानानुसार घटनेच्या वेळी त्यांना धावपळ करणेही शक्य होत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर वाहनांसह सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचते. मात्र, आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जागा अपुरी असल्यास अथवा उंच इमारतीवर आग असल्यास अधिकाधिक कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यामुळे इतर यंत्रणा असूनही त्याचा उपयोग होत नाही. मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी होत असतानाही अद्याप उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. (प्रतिनिधी)