शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षतेच्या उपाययोजना

By admin | Updated: January 26, 2016 01:38 IST

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावरून सुरू ठेवलेल्या प्रचाराकडे पिंपरी-चिंचवडमधील तरुणवर्ग आकर्षित होऊ लागल्याचे एका संघटनेच्या सर्वेक्षणातून नोव्हेंबरमध्ये निदर्शनास आले

पिंपरी : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावरून सुरू ठेवलेल्या प्रचाराकडे पिंपरी-चिंचवडमधील तरुणवर्ग आकर्षित होऊ लागल्याचे एका संघटनेच्या सर्वेक्षणातून नोव्हेंबरमध्ये निदर्शनास आले. त्यातच मुंबईत स्फोट घडवून आणण्याचा इशारा देणाऱ्या एका आरोपीला पुण्यात पकडले. त्यामुळे दहशतवादी कारवायांच्या शक्यतेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पोलीस यंत्रणा सजग झाली असून, दक्षतेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. इस्लामिक स्टेट असा उद्देश बाळगून कार्यरत असलेल्या इसिस (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया) या दहशतवादी संघटनेने टिष्ट्वटर, यू ट्यूब, फेसबुक, गुगल अशा सुमारे ९० हजारांहून अधिक सोशल साइट अकांउटच्या माध्यमातून प्रचार सुरू ठेवला आहे. इसिसने आपले जाळे पसरविण्यास सुरुवात केली असताना, कल्याणमधील चार तरुण इसिसमध्ये सहभागी झाल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने भारताला इसिसपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही युवकांनी शहरात आश्रय घेतल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते.जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगलीमहाराज रस्ता बॉम्बस्फोट या घटना पुण्यात घडल्या आहेत. त्यामुळे पुण्यात दहशतवादी हल्ले होत असल्याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे. त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे. स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्याच्या ताज्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा अधिक सजग झाली आहे. (प्रतिनिधी)