शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पुरस्काराने जन्माचे सार्थक- रूपकुमार राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:50 IST

चिंचवड येथे रंगला आशा भोसले पुरस्कार सोहळा

पिंपरी : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ज्या व्यासपीठावर सन्मान मिळाला, त्याच व्यासपीठावर गौरव होणे ही भाग्याची गोष्ट आहे. सात जन्मांचे पुण्य फळाला आले आहे. गानसरस्वती आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार मिळाला. जीवनाचे सार्थक झाले, असे भावोद्गार प्रसिद्ध संगीतकार आणि गायक रूपकुमार राठोड यांनी काढले.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे १७वा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांना प्रदान करण्यात आला. एक लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी व्यासपीठावर महापौर राहुल जाधव, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष राजेशकुमार सांकला, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाट्य परिषद शिरूर शाखाध्यक्ष दीपाली शेळके, तळेगावप्रमुख सुरेश धोत्रे, अभिनेते सुशांत शेलार आदी उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना रूपकुमार राठोड म्हणाले, ‘‘संगीताची पूजा आणि गौरव करणारे चिंचवडगाव आहे. संगीताच्या माध्यमातून सेवा करण्याचे काम करीत आहे. संगीताच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त करायला मिळते, ही मोठी संधी आहे.’’ महापौर जाधव म्हणाले, ‘‘शहराचा सांस्कृतिक वारसा आणि वसा जपण्याचे काम नाट्य परिषदेने केले आहे. सांस्कृतिक जडणघडणीत नाट्य परिषदेचे योगदान आहे.’’ राजेशकुमार सांकला यांनी आभार मानले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले.लतादीदींनी आम्हाला प्रेझेंट केले नाहीमंगेशकर यांनी एक खंत व्यक्त केली. लतादीदींनी मला, आशाताई, मीनाताई, उषाताई यांना कधी पे्रझेंट केले नाही. आम्हाला गायक म्हणून सादर केले नाही. मात्र, रूपकुमारांच्या मुलीला केले. त्यावरून ती किती आश्वासक गायिका आहे, हे दिसून येते, असे गौरवोद्गार काढले.राठोड यांचे सांगीतिक घराणेपंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी रूपकुमार यांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘राठोड यांचे सांगीतिक घराणे आहे. त्यांच्या कुटुंबात संगीत परंपरा आहे. वयाच्या तिशीपर्यंत तबलावादनाचे काम करून पुढे उत्तम गायक आणि संगीतकार अशी कारकीर्द त्यांनी घडविली आहे. रूपच्या प्रेमप्रकरणापासून संगीतातील यशाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या पत्नी सुनाली राठोड याही गायिका आहेत. मुलगी रिवा ही आधुनिक पिढीची आश्वासक गायिका आहे.’’पुरस्कार सैनिकांना अर्पणराठोड यांनी कार्यक्रमात बहार आणली. ‘तू ही तो जन्नत मेरी...’ हे गाणे सादर करून दाद घेतली. रिवा राठोड यांनी ‘अलबेला सजन आयो रे...’ हे गीत सादर करून रसिकांची दाद घेतली. ‘सरहद पर तनाव है क्या, पता करो चुनाव है क्या’ हा शेर पेश करून राठोड यांनी शहिदांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पुरस्कारासाठी मिळालेले मानधन सैनिक निधीसाठी देण्याचे जाहीर केले.

टॅग्स :Roop Kumar Rathodरूप कुमार राठोड