शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे

By admin | Updated: March 10, 2017 04:59 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नितीन काळजे, उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी, तर राष्ट्रवादीकडून श्याम लांडे, उपमहापौरपदासाठी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नितीन काळजे, उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी, तर राष्ट्रवादीकडून श्याम लांडे, उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांनी आज अर्ज सादर केला आहे. त्यामुळे १४ मार्चला निवडणूक होणार आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपाचाच महापौर आणि उपमहापौर होणार असल्याचे चित्र आहे. अधिकृत घोषणा बाकी आहे.महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता होती. यासाठी चिंचवड विधानसभेतून नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, भोसरी विधानसभेतून नितीन काळजे, संतोष लोंढे, पिंपरी विधानसभेतून केशव घोळवे यांची नावे चर्चेत होती. महापौरपद भोसरी, पिंपरी, की चिंचवडला मिळणार याबाबत चर्चा रंगली होती. उमेदवारीअर्ज भरण्याची मुदत जसजशी जवळ येत होती. तोपर्यंत नितीन काळजे आणि नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे यांच्या नावांची चर्चा सकाळपासून होती. व्हॉट्स अ‍ॅपवरही महापौरपदाची निवड झाली, असे दावे केले जात होते. दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यामुळे महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावर समर्थकांची गर्दी झाली होती. महापौरांच्या कार्यालसमोरील दालन गर्दीने भरले होते. दुपारी चारला पालकमंत्री गिरीश बापट, पक्षनेते एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर सुमारे २० मिनिटे महापौरांच्या अँटी चेंबरमध्ये नेत्यांची चर्चा झाली. त्या वेळी महापौरपदासाठी इच्छुक उपस्थित होते. या वेळी सर्वांना नावाची उत्सुकता होती. पालकमंत्र्यांनी इच्छुकांची समजूत काढली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नितीन काळजे यांचे नाव सुचविले आहे, असे सांगितले. त्यानंतर काळजे आणि मोरे यांनी सायंकाळी पावणेपाचला अर्ज सादर केले. (प्रतिनिधी)बिनविरोधचा प्रयत्न फसलापक्षीय बलाबलानुसार विरोधक आणि अपक्षांची एकत्रित बेरीज केली, तरी सर्वाधिक मतांची जमवाजमव विरोधकांना करणे अशक्य आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी उतरणार नव्हती. मात्र, बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही, अशी खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे. त्यामुळे ऐनवेळी या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही अर्ज भरला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा बिनविरोध महापौर निवडीचा प्रयत्न फसला आहे.