शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

परवाना नसतानाही महापौरांनी चालविली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 02:27 IST

परवाना नसताना महापौर राहुल जाधव यांनी स्टेअरिंग हातात घेऊन चक्क बस चालवली.

संजय माने पिंपरी : परवाना नसताना महापौर राहुल जाधव यांनी स्टेअरिंग हातात घेऊन चक्क बस चालवली. महापौरांकडे हलकी वाहने चालविण्याचा असलेला परवाना २०११ ला संपुष्टात आला आहे. १६ जून २००८ ला काढलेला परवाना २०११ ला मुदत संपुष्टात आल्यानंतर नूतनीकरण केलेला नाही. त्यामुळे बसचे सारथ्य करण्याने महापौरांपुढे अडचण निर्माण झाली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपदासाठी ओबीसीचे आरक्षण असल्याने भाजपाचे नगरसेवक जाधव यांना शहराचे प्रथम नागरिक होण्याचा बहुमान मिळाला. नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी ते रिक्षा चालवित होते. त्या वेळी रिक्षा व्यवसायात असलेल्या त्यांच्या जुन्या मित्रांनी आठवणींना उजाळा दिला. ते महापौरांच्या संपर्कात आले. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक़्रमास मोरवाडी, पिंपरी येथे महापौर उपस्थित होते. त्या वेळी रिक्षावाले जुने मित्र भेटले. त्यांनी महापौर जाधव यांना रिक्षातून फेरफटका मारण्याचा आग्रह धरला. त्यांच्या आग्रहास्तव महापौरांनी रिक्षातून त्या मित्रांना शहराची सफर घडवून आणली.गुरुवारी पीएमपीएलच्या ई-बसची (इलेक्ट्रिक बस) चाचणी चिखली येथे घेण्यात आली. त्या वेळी चक्क महापौर जाधव यांनी ही अत्याधुनिक बस चालवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महापौरांनी ई- बसचे सारथ्य केल्यानंतर रिक्षावाला महापौर अशी त्यांची शहरभर चर्चा रंगली.ही चर्चा रंगली असताना माजी महापौर वैशाली घोडेकर आणि अपर्णा डोके यांनाही तीन चाकी रिक्षात बसवून शहराची सफर घडवून आणली. विशेष म्हणजे जड वाहने चालविण्याचा परवाना नसताना महापौरांनी वाहतूक नियमांना बगल देऊन रिक्षा ते बसमधून रपेट करण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे.सामान्य व्यक्तीला उच्च पदावर काम करण्याची संधी मिळणे, ही बाब त्या व्यक्तीसह समाजालाही प्रेरणादायी ठरणारी असते. त्याबद्दल कोणाचे दुमत नसते; परंतु महत्त्वाचे पद भूषविताना, त्या पदाची प्रतिष्ठा सांभाळणे, जबाबदारीचे भान राखणेही तितकेच महत्त्वाचे असते. पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांचा रिक्षावाला ते महापौर असा प्रवास झाल्याचा शहरभर गवगवा सुरू आहे. महापौर राहुल जाधवसुद्धा त्यात बेभान झाले असून, कोणी जुना मित्र भेटला तरी त्याला स्वत: रिक्षा चालवून शहरात फेरफटका मारू लागले आहेत. रिक्षावाले महापौर अशी ओळख निर्माण झाल्यानंतर रोजच रिक्षातून त्यांचा फेरफटका सुरू आहे.>परवाना असल्याचा दावारिक्षातून फेरफटका मारण्यासाठी आपण रिक्षा चालवली. तसेच पीएमपीच्या ई-बसची चाचणी घेतली जात असताना, चिखली मार्गावर बसही चालवली. पहिल्यापासून रिक्षा असो की टेम्पो, ट्रक, अथवा बस कोणतेही वाहन आपण चालवू शकतो. ड्रायव्हिंगची आवड आहे, आपणाकडे सर्व प्रकारची वाहने चालविण्याचा परवानादेखील आहे. त्यामुळे काही काळजी करण्याचे कारण नाही.- राहुल जाधव, महापौर>वाहन परवाना मुदत संपलेलापिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून १६ जून २००५ ला पहिल्यांदा दुचाकीचा परवाना घेतला. या परवान्याची मुदत २०२५ पर्यंत आहे. ट्रान्सपोर्टसाठी वापरात येणारी वाहने चालविण्याच्या परवान्याचे दर तीन वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक असते. त्यांच्याकडील या परवान्याची मुदत २००८ ते २०११ पर्यंत होती. त्यांनी परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही.