शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मावळात काँग्रेसचा शिवसेनेच्या ૪ उमेदवारांना अधिकृत जाहिर पाठिंबा

By admin | Updated: February 17, 2017 20:29 IST

राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो याचा प्रत्यय सध्या मावळ तालुक्यात येत असून जसजशी मतदानाची तारिख जवळ येऊ लागली आहे तसतसे राजकारणाचे

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 17 -  राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो याचा प्रत्यय सध्या मावळ तालुक्यात येत असून जसजशी मतदानाची तारिख जवळ येऊ लागली आहे तसतसे राजकारणाचे वारे चित्रविचित्र वाहू लागले आहेत. मावळ तालुक्यात काँग्रेस आय पक्षाने अधिकृत पत्रक काढत शिवसेनेच्या कुसगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सत्यभामा शांताराम गाडे, कुसगाव पंचायत समितीच्या उमेदवार उषा संजय घोंगे, वाकसई पंचायत समितीचे सदस्य बाबु शेळके, चांदखेड पंचायत समितीच्या उमेदवार मनिषा आनंदा मालेकर (केदारी) यांना जाहिर पाठिंबा दिला असल्याचे काँग्रेस आयचे मावळ तालुका कार्याध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी सांगितले. 
    पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे व भरत दळवी यांच्या सदर पाठिंबा पत्रकावर स्वाक्षर्‍या आहेत. काँग्रेस  पक्षाची कुसगाव जिल्हा परिषद गटात व चांदखेड पंचायत समिती गणात चांगली ताकद आहे. ही ताकद शिवसेनेच्या मागे पुर्ण क्षमतेने उभी करुन शिवसेना उमेदवार निवडून देण्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आले आहे. या बदल्यात काही जागांवर शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचा अंतर्गत समजोता झाला आहे. 
    दोनच दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरांची मोठ ब‍ांधत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांनी समांतर राष्ट्रवादी पक्ष तयार करत राष्ट्रवादी समोर आव्हान निर्माण केले आहे तर दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देत भाजपाची कोंडी करण्याची तयारी केली आहे. वास्तविक मावळात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची मोठी ताकद आहे. बहुतांश काळ या दोन पक्षांकडे तालुक्यातील राजकिय शक्तीस्थळे असून देखिल मावळ तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला नाही याच करिता मतदानाकरिता अवघा काही दिवसांचा अवधी राहिला असताना या दोन्ही पक्षांना रोखण्यासाठी राजकिय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत उघड बंडखोरी असली तरी भाजपात सर्व अल्बेल आहे असं नाही. भाजपामध्ये देखिल उमेदवारी न मिळालेल्या इच्छूकांमध्ये आजुनही नाराजीचा सूर कायम आहे. कोणी उघड बंडखोरी केली नसली तर इच्छूकांची नाराजी भाजपासाठी डोकेदुखी ठरु शकते.