शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

माऊलींचे पालखी प्रस्थान ६ जुलैला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:05 IST

श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलैला आळंदीतून प्रस्थान होत आहे.

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलैला आळंदीतून प्रस्थान होत आहे. ‘श्रीं’च्या पालखी सोहळाप्रमुखपदी अ‍ॅड. विकास ढगे-पाटील यांची निवड झाल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी दिली.श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीच्या पुणे कार्यालयात या निवडीसाठी प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक सभा झाली. या सभेत उपस्थित विश्वस्त मंडळांच्या चर्चेनंतर अ‍ॅड. पाटील यांची पालखी सोहळाप्रमुखपदी निवड झाली.अलंकापुरीतून ६ जुलैला पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. आळंदी ते पंढरपूर या मार्गावर प्रस्थानानंतर ठिकठिकाणी १६ मुक्काम होतील. ६ जुलैला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर हरिनाम गजरात पायी वारीतून प्रवास करीत १७व्या दिवशी ‘श्रीं’चा पालखी सोहळा २२ जुलैला वाखरी मार्गे पंढरीला येईल. २३ जुलैला आषाढी एकादशी सोहळ्यात साजरी होईल.सोहळ्यातील पायी वारी प्रवासात भाविक, वारकरी, नागरिक आणि प्रवासात सेवासाधने असणारी वाहनव्यवस्था प्रभावी ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाला दक्षता घेण्याचे दृष्टीने संस्थान कमिटीने सेवासुविधांसाठी मागण्यांचे निवेदन दिले आहे.पायी वारी काळात भाविकांना सुलभ दर्शनव्यवस्था, पालखी विसावे, मुक्कामाचे ठिकाणी आरोग्य, स्वच्छता, पालखीतळ परिसरात सेवासुविधा मिळण्यासाठी संस्थानाने प्राधान्य दिले आहे. यासाठी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, सेवक बाळासाहेब चोपदार रणदिवे, राजाभाऊ चोपदार रंधवे, पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, आळंदी देवस्थानाचे विश्वस्त पदाधिकारी यांनी पालखी मार्गावरील तळांची संयुक्त पाहणी केली. दरम्यान, पाहणीत सेवासुविधांसाठी तसेच स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, इंधन व्यवस्था आदींबाबत समस्या जाणून घेतल्या. अधिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आळंदी संस्थान मासिक सभेत चर्चा करून पुणे विभागीय आयुक्त, पुणे, सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तळावरील सोयीसुविधांसाठी साकडे घालण्यात आले आहे. यासाठी प्रमुख विश्वस्त टिळक यांनी निवेदन दिले असल्याचे सांगितले.पालखीतळाला संरक्षक भिंतीचे बांधकाम, तळांचे सपाटीकरण, मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात यावे, श्रींची पालखी विसावण्यासाठी ७ फूट लांब, ४ फूट रुंद व २ फूट उंच मजबूत कट्टा ओटा विकसित करावा, या ओट्यासमोर कीर्तन, जागर धार्मिक कार्यक्रमासाठी ७० फूट लांब आणि ३० फूट रुंद जागेत सिमेंटीकरणाचे काम करण्यात यावे, श्रींचे भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्थेसाठी दर्शनबारी, तळ परिसरात चारही बाजूंनीपिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, स्वच्छतागृहे तसेच विद्युत व्यवस्था अखंड ठेवण्याची दक्षता घेतली जावी अशी मागणी डॉ. अभय टिळक यांनी केली आहे.