शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

माऊली दाभाडे यांच्या निलंबनाचा ठराव

By admin | Updated: March 5, 2017 04:26 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते, संत तुकाराम साखर कारखाना संचालक माऊली दाभाडे

वडगाव मावळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते, संत तुकाराम साखर कारखाना संचालक माऊली दाभाडे यांच्यावर सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्याचा ठराव कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत केल्याची माहिती तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, मला पक्षातून काढून टाकण्याचे खट्याळ आणि ठेंगड्या मनोवृत्तीचे दर्शन आहे, अशी टिका दाभाडे यांनी केली. निवडणुकीत गटातटाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला. त्या संदर्भात आयोजित कार्यकर्ता चिंतन बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी चर्चा करून माऊली दाभाडे यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत त्यांना पक्षातून निलंबित करावे अशी मागणी केली. बंडखोरी केलेल्या बाबुराव वायकर, नारायण ठाकर, दत्तात्रय पडवळ, राजेंद्र कुडे, तुकाराम आसवले यांची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात दाभाडे यांनी समांतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची घोषणा केली व बंडखोर उमेदवारांना ताकत देत त्यांना पाठिबा दिला. निवडणुकीत राष्ट्रवादीतून बाहेर पडून अपक्षांचे काम केले, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. दाभाडे यांची पक्षातून निलंबन करण्याचा ठराव अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांना पाठवण्यात आला आहे. मदन बाफना, बाळासाहेब नेवाळे, रमेश गायकवाड, अमोल केदारी, शुभांगी राक्षे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)ठेंगड्या मनोवृत्तीचे दर्शनमाऊली दाभाडे म्हणाले, ‘‘मुळात जो पदाधिकारी राष्ट्रवादी काँगे्रसचा क्रियाशील सभासद नाही, असा व्यक्ती माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर कारवाई करतो, हे ठेंगड्या मनोवृत्तीचे दर्शन आहे.’’