शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोडला प्रथमच आठवडे बाजार

By admin | Updated: April 29, 2017 04:12 IST

कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये जय हनुमान शेतकरी कृषी गट व कॅन्टोन्मेन्ट बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे

देहूरोड : कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये जय हनुमान शेतकरी कृषी गट व कॅन्टोन्मेन्ट बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे मित्र परिवार यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने गुरुवारपासून शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. शासनाने सुरू केलेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत बळिराजाच्या शेतातील शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात देण्याच्या उद्देशाने कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीत बँक आॅफ इंडियाच्या शाखेजवळ आठवडे बाजाराचे गुरुवारी कॅन्टोन्मेन्ट सदस्य तंतरपाळे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, रामकिसन गर्जे, सुनील उपाध्याय, पंकज तंतरपाळे यांच्यासह संकल्पनगरी परिसरातील नागरिक उपस्थित होते. येथील आठवडे बाजार दर गुरुवारी व रविवारी भरविण्यात येणार आहे. बाजारात भाजीपाला, फळे, सेंद्रिय व गावरान भाजीपाला, धान्य व कडधान्ये, राजसी भाजीपाला उपलब्ध करण्यात आला आहे. बाजाराच्या पहिल्या दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे सांगण्यात आले. शेतकरी आठवडा बाजारांमध्ये उकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री बंधनकारक करण्यात आली असल्याने दर्जेदार मालच या बाजारामध्ये आणला जाणार आहे. (वार्ताहर)