शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत गर्दी, ना गोंगाट!

By admin | Updated: February 8, 2016 02:03 IST

शहर आणि परिसरातील भागासाठी पिंपरीतील बाजारपेठ ही मध्यवर्ती असल्याने सुटीच्या दिवशी हमखास गर्दी, असे नेहमीचे चित्र असते

पिंपरी : शहर आणि परिसरातील भागासाठी पिंपरीतील बाजारपेठ ही मध्यवर्ती असल्याने सुटीच्या दिवशी हमखास गर्दी, असे नेहमीचे चित्र असते. मात्र, रविवारी सुटीच्या दिवशी गर्दी ना गोंगाट अशी परिस्थिती पिंपरी बाजारपेठेत अनुभवास आली. सुटीच्या दिवशी पिंपरी बाजारपेठेत दिवसभर गर्दी असते. सायंकाळी तर तोबा गर्दी उसळते. रविवारी मात्र उलट स्थिती पहावयास मिळाली. दुचाकीस्वारांनी घेतलेली हेल्मेटसक्तीची धास्ती हे त्यामागील कारण आहे.इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे जाताना रविवारी आणि अन्य सार्वजनिक सुटीच्या दिवशी वाहनांची मोठी गर्दी दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने दुचाकींची संख्या अधिक असते. रविवारी पिंपरीत मंडई असो की, कापड बाजारपेठ कोठेही सहज वावर करणे शक्य होत होते. ज्यांच्याकडे हेल्मेट होते. ते दुचाकीवरून संपूर्ण बाजारपेठेत विनाअडथळा सहज फेरफटका मारत होते. दुचाकीवाल्यांना अडवून हेल्मेट नसल्यास शंभर रुपये दंड आकारणी केली जात असल्याने ज्यांच्याकडे हेल्मेट नाही, त्यांनी इच्छा असूनही बाजारपेठेत जाण्याचे टाळले. दोन दिवसांपासून वाहतूक पोलीस हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. सुमारे दोन हजार वाहनचालकांकडून दंड वसूल केल्याचे वृत्तपत्रात वाचल्यानंतर दुचाकीवर बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. हेल्मेट असेल, तरच बाहेर पडण्याचे धाडस दाखवले जात आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त पुण्यात अथवा अन्य ठिकाणी जायचे असल्यास अनेकांनी दुचाकीऐवजी पीएमपी बसने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. ज्यांच्याकडे दुचाकीसह मोटार आहेत, त्यांनी आवर्जून ती बाहेर काढली. रस्त्यावर तसेच बाजारपेठेतही चारचाकी वाहने अधिक संख्येने दिसून आली. मंडईत ग्राहक आणि हातगाडीवाले यांची गर्दी होत असते. रविवारी मात्र उलट परिस्थिती दिसून आली. अंतर्गत रस्त्यावर मोटारींच्या गर्दीने अडथळे निर्माण झाले. बाजारपेठेत न जाता घराजवळच्या दुकानात खरेदी करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले. पत्नी व लहान मुले अशा कुटुंबासह दुचाकीवर बाजारपेठेत येणाऱ्यांनी हेल्मेटसक्तीच्या धास्तीने बाजारपेठेत जाणे टाळले. नसती कटकट नको, अनेकजण दुचाकी घेऊन घराबाहेर पडले नाहीत. (प्रतिनिधी)