पिंपळे गुरव : येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने तुळजापूर येथे मराठवाडा जनगणना अभियानाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. तसेच, तुळजाभवानी मंदिरामध्ये मराठवाडा भवन निर्मिती संकल्प पुस्तकाचे प्रकाशन, माहितीसाठी वेबसाईट आणि सदस्य नोंदणीसाठी ‘मिस कॉल’सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येलेकर, नितीन चिलवंत, बालाजी पवार, योगेश जगताप, भैरुजी मंडले, सूर्यकांत कुरुलकर, प्रकाश इंगोले, बबन चव्हाण, गोपाळ माळेकर आदी उपस्थित होते. अरुण पवार म्हणाले, ‘‘आपण सर्वांनी मिळून तुळजाभवानी आईच्या मंदिरात येऊन हे कार्य हाती घेतले, तर निश्चितच पूर्ण होईल. ’’नितीन चिलवंत यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
मराठवाडा ट्रस्टतर्फे जनगणनेला प्रारंभ
By admin | Updated: April 29, 2017 04:06 IST