शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतकराइतकाच विकासनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:18 IST

येथील ग्रामपंचायत मासिक सभेत विकासनिधी घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार नवीन मिळकती व घरांच्या मिळकत कर म्हणजे घरपट्टीइतका विकास निधी घेतला जात आहे.

देहूगाव : येथील ग्रामपंचायत मासिक सभेत विकासनिधी घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार नवीन मिळकती व घरांच्या मिळकत कर म्हणजे घरपट्टीइतका विकास निधी घेतला जात आहे. हा अन्यायकारक विकासनिधी त्वरित बंद करून सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानोबा काळोखे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामांना मंजुरी देण्याचे अधिकार नसल्याने व जिल्हा नियोजन व विविध विकास प्रकल्पांसाठी अडचणी येत असत. काही वर्षांपासून हद्दीतील नवीन बांधकामांच्या व मिळकतींच्या नोंदी बंद होत्या. मात्र, हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊन गावांचा आकार मोठा झाला होता. सोयी सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने ग्रामस्थांच्या मागणीचा रेटा होता व महसूलही बुडत होता. याची दखल घेत राज्य शासनाने ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मिळकती नोंद करण्याचा निर्णय घेतला. आॅक्टोबर २०१६ मध्ये बांधकामांच्या नोंदी नोंदवीत असतानाच नवीन दराने घरपट्टीएवढाच विकास निधी जमा करण्याचा ठराव ग्रामपंचायत मासिक सभेत घेण्यात आला. मार्च २०१६ पासून नोंदीची सुरुवात झाली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामे करण्यात येत आहेत. देहूतील विकास करण्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत ग्रामस्थांचा निर्णय न घेता निधी जमा करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काळोखे यांनी केला आहे. हा निधी घेत असताना किती घरांच्या नोंदी झाल्या आहेत. पावत्या किती मिळकतधारकांना दिल्या आहेत. रक्कम कोणत्या बॅँकेत, कोणत्या खात्यात आणि कधी भरणा केला आहे, नवीन घरांच्या नोंदीसाठी किती अर्ज प्राप्त झाले, किती नोंदी पूर्ण केल्या व किती महसूल मिळाला आहे आदी प्रश्न उपस्थित करून याचा हिशेब व या संबंधीचे इतिवृत्त ७ नं. पावतीचे पावती पुस्तके ताब्यात घेऊन चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी काळोखे यांनी केली आहे.हेमलता मोरे या सरपंच असताना २१ सप्टेंबर २०१६ च्या मासिक सभा ठराव क्रमांक ७२ नुसार मिळकत नोंदी करताना मालकी हक्काच्या दस्तऐवजांची छाननी करावी. प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमापे घ्यावीत. नोंदी करताना वार्डनिहाय स्वतंत्र नोंदपुस्तक ठेवावे व घरपट्टी सोबतच जेवढी घरपट्टी एवढी विकासनिधी ७ नंबरच्या पावतीने घ्यावी. हा निधी लोकवर्गणी फंडात जमा करून त्याचा वॉर्ड विकासासाठी सदस्य सुचवतील त्याप्रमाणे विकास कामे करावीत असा ठराव केला आहे. ग्रामसचिव म्हणून ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांनी पंचायत समिती येथील आढावा सभेत दिलेल्या तोंडी सूचनेनुसार नवीन नोंदी करताना कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी विकास निधी घेण्यात येऊ नये, असे मत नोंदविले आहे.