शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विकासाला माफियांचा खोडा

By admin | Updated: December 9, 2015 00:15 IST

स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरी हिंजवडीतील विकासातील प्रमुख अडसर सदोष भूसंपादन कारवाई आहे. स्थानिक माफिया आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्या संगनमतामुळे

विश्वास मोरे,  पिंपरीस्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरी हिंजवडीतील विकासातील प्रमुख अडसर सदोष भूसंपादन कारवाई आहे. स्थानिक माफिया आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्या संगनमतामुळे विकासात अडचण येत आहे. माहिती-तंत्रज्ञाननगरीसाठीचे बस टर्मिनस, वाहनतळ, हिंजवडीस जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची आरक्षणे अजूनही विकसित झालेली नाहीत. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने हिंजवडी, माण, मारुंजी आयटी पार्कची निर्मिती केली. मात्र, पायाभूत सुविधांचा कमालीचा अभाव येथे दिसून येतो. आयटी पार्कमध्ये येण्यासाठी केवळ तीन रस्ते आहेत. मात्र, बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नाही. एकाच रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. पायाभूत सुविधांचा अभाव, याबरोबरच रस्ते, आरक्षणे विकसित झालेली नाहीत. बहुतांश रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. त्या कामांना मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हाळुंगे ते हिंजवडी रस्ता बासनात हिंजवडीतील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी म्हाळुंगे ते हिंजवडी आयटी पार्क टप्पा दोनला जोडणाऱ्या रस्त्याचा पर्याय सुचविण्यात आला होता. २००८ मध्ये याबाबतची भूसंपादन कारवाईही सुरू केली होती. नोटिफिकेशनही झाले होते. सदानंद हॉटेल ते टप्पा दोन असे नियोजन केले होते. मुळा नदीवर पूल उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र, भूसंपादनात अन्याय झाल्याने शेतकऱ्यांनी हे काम थांबविले होते. बिल्डर आणि भूमाफियांच्या मदतीने शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याने न्यायालयात धाव घेतली होती. भूसंपादन कारवाईसाठी सुमारे ३२ कोटींचा निधी मंजूर केला होता. भूसंपादन कारवाई संशयास्पद असल्याने वाकड-हिंजवडीतील अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात दावे दाखले केले आहेत. त्यामुळे हे काम बंद आहे.गावांना जोडणारे रस्ते बंद माहिती-तंत्रज्ञाननगरी विकसित करताना जुन्या गाव रस्त्याचा विचार न करता विकास केल्याचे दिसून येते. नेरे, कासारसाई, मारुंजी ते माणगावला जाण्यासाठी मारूंजीच्या शेजारून पाणंद रस्ता होता. तसेच जुन्या कॅनॉलच्या कडेनेही रस्ता निर्माण केला होता. मात्र, मारुंजी गावातून फेज दोनमार्गे माणला जाणारा रस्ता जड वाहनांना बंद केला आहे. आयटी पार्क ते गाव हा केवळ ७०० मी.चा रस्ता बंद केल्याने या भागातील नागरिकांना १० कि.मी.चा वळसा घालून जावे लागते.