शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्थान असेल तोपर्यंत संगीत जिवंत राहील : बेगम परवीन सुलताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 14:00 IST

भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतास मोठी पंरपरा

ठळक मुद्देनिगडी प्राधिकरणातील सोहळ्यात स्वरसागर पुरस्कार प्रदान

पिंपरी : आमच्यासारखे कलावंत व हिंदुस्थान जोपर्यंत असेल, तोपर्यंत हिंदुस्थानी संगीत जिवंत राहील, असे मत प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांनी व्यक्त केले. निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर २१ व्या ‘स्वरसागर’ संगीत महोत्सवास सुरुवात झाली. महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी सुलताना बोलत होत्या. यावेळी महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रसिद्ध गायक महेश काळे, उपमहापौर तुषार हिंगे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी महापौर राजू मिसाळ, अनुराधा गोरखे, सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, रोख पंचवीस हजार, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. परवनी सुलताना म्हणाल्या, ‘‘भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतास मोठी पंरपरा आहे. ही परंपरा आपण जपायला हवी. पंधरा वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड शहरात आले आहे. पुरस्कार मिळाल्याने अत्यानंद झाला आहे. संगीत रसिक या ठिकाणी आहेत याची अनुभूती मला आली आहे. मला स्वरसागर पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार हे प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असतात. भारतीय संगीत हे चिरकाल टिकणारे आहे.’’ कार्यक्रमाआधी संदीप उबाळे, योगिता गोडबोले आणि सुवर्णा राठोड यांचे मराठी सुगम संगीत सादर झाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmusicसंगीत