शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा पालिका बनली डिजिटल

By admin | Updated: January 30, 2016 03:59 IST

महाराष्ट्रातील ब व क नगर परिषदांमध्ये पहिली डिजिटल नगर परिषद बनण्याचा मान लोणावळा नगर परिषदेला मिळाला आहे. २६ जानेवारी २०१६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून

लोणावळा : महाराष्ट्रातील ब व क नगर परिषदांमध्ये पहिली डिजिटल नगर परिषद बनण्याचा मान लोणावळा नगर परिषदेला मिळाला आहे. २६ जानेवारी २०१६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोणावळा नगर परिषदेमध्ये सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन सेवांचा शुभारंभ नगराध्यक्ष अमित गवळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. नगर परिषदेमधील सर्व सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. आॅनलाइन सेवांमध्ये नागरिकांना जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, थकबाकी नसल्याचा दाखला, मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र, कर उतारा, वारसा हक्क मालमत्ता, हस्तांतरण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, झोन दाखला, बांधकाम परवानगी, भाग नकाशा, भोगवटा प्रमाणपत्र, नळजोडणी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अशा अनेक आॅनलाइन सेवा नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांना ६६६.’ेू.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळावरून जाऊन या सुविधेचा लाभ घेता येईल. आॅनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना या सुविधांचा लाभ घेणे सोयीस्कर होणार आहे. पहिल्या २ दिवसांतच ५१७५ नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. साधारण २५ नागरिकांनी सेवा अधिकाराद्वारे प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत. तरुणवर्ग व शहराबाहेर राहत असणाऱ्या मिळकतधारकांनी विशेष कौतुक केले आहे. मुख्याधिकारी गणेश शेटे यांचे अथक परिश्रम व नगराध्यक्ष अमित गवळी यांची साथ यांमुळे लोणावळा नगर परिषद महाराष्ट्रातील पहिली डिजिटल नगर परिषद बनली आहे. आॅनलाइन सेवा सुरू करणाऱ्यांसाठी मायनेट प्रणालीचे ज्ञानेश्वर चिंतामणी, कुणाल गांधी व नगर परिषदेच्या फॅसिलिटी मॅनेजर सोनाली सासवडे यांनी अथक प्रयत्न घेतले. (वार्ताहर)