शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष स्वागतासाठी लोणावळा सज्ज

By admin | Updated: December 21, 2015 00:27 IST

नाताळाच्या सुटीला जोडून आलेल्या सलग चार सुट्या व थर्टी फर्स्ट नाइट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात मोठ्या संख्येने येणारे मुंबई-पुणेकर पर्यटक यांच्या स्वागतासाठी लोणावळानगरी

लोणावळा : नाताळाच्या सुटीला जोडून आलेल्या सलग चार सुट्या व थर्टी फर्स्ट नाइट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात मोठ्या संख्येने येणारे मुंबई-पुणेकर पर्यटक यांच्या स्वागतासाठी लोणावळानगरी सज्ज झाली आहे. अनेक हॉटेलांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, थर्टी फर्स्टसाठी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळ्यात जवळपास १८० लहान-मोठे हॉटेल आहेत. तसेच सेनेटोरियम, मोठ्या सोसायट्या व हजारोंच्या संख्येने सेकंड होम असल्याने पुढील दहा दिवस शहरात पर्यटकांची जत्राच भरणार आहे. या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अनेक हॉटेल व्यावसायिकांनी पार्ट्या व संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवार अखेरपर्यंत ३५ व्यावसायिकांनी शहर पोलिसांकडे वाद्य परवाना मिळावा, म्हणून अर्ज केले आहेत. सर्वत्र या उत्सवाची धूम सुरू आहे. या दहा दिवसांत येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या मात्र नाकी नऊ येणार आहेत. तसेच शहरातील व पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते अपुरे पडणार असल्याने शहरात येताना पर्यटकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, तसेच शहरातील नागरिकांनी या काळात होणारी गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो चारचाकी वाहने रस्त्यावर न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात पार्ट्यांकरिता येणाऱ्या काही हुल्लडबाज पर्यटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, तसेच बेशिस्त वाहन चालवून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याकरिता वाहतूक पोलीस, पोलीस मित्र, बे्रथ अ‍ॅनालायझर, स्ट्रायकिंग फोर्स आदीसह अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. (वार्ताहर)