शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘लोकमत’च्या ‘विश्वकर्मा : द ड्रीम बिल्डर्स’ कॉफीटेबल बुकचे आज प्रकाशन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:56 IST

डॉ. के. एच. संचेती, डॉ. शां. ब. मुजुमदार, चंदू बोर्डे, पं. सुरेश तळवलकर, कीर्ती शिलेदार यांचा सन्मान

पुणे : आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यकर्तृत्वाची यशोगाथा उलगडणाऱ्या लोकमत माध्यम समूहाच्या ‘विश्वकर्मा- द ड्रीम बिल्डर्स आॅफ महाराष्ट्र अ‍ॅँड गोवा’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन उद्या (सोमवार) होणार आहे. कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टिन येथे हा सोहळा रंगणार आहे. दुपारी तीन वाजता प्रकाशन समारंभ होईल.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, नॅशनल क्रेडाईचे अध्यक्ष (इलेक्ट) सतीश मगर प्रमुख पाहुणे आहेत. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह औद्योगिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रांतील विविध मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी आहेत.आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत बांधकाम व्यावसायिकांचा महत्त्वाचा सहभाग आहे. विकासाच्या पाऊलखुणा ओळखून गुंतवणुकीचे धाडस त्यांनी दाखविले. त्यातून राज्यातील अनेक भागांचा चेहरामोहराच बदलून गेला. एका अर्थाने ‘विश्वकर्मा’ म्हणूनच ते काम करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या कॉफीटेबल बुकमध्ये घेण्यात आला आहे. प्रगतीची शिखरे पाहत तरुणांनाही त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘आयकॉन्स’ ही कॉफीटेबल बुकची मालिका सुरू करण्यात आली आहे.यशोशिखरावर पोहोचतानाच हजारोंच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण करणा-या ‘विश्वकर्मा’च्या गौरवगाथेचा भव्य अनावरण सोहळा सोमवारी होणार आहे. या समारंभाला मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर व वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच आहे.विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार गौरव‘विश्वकर्मा : द ड्रीम बिल्डर्स आॅफ महाराष्ट्र अँड गोवा’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करत सामाजिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या मान्यवरांचा ‘लोकमत महाराष्ट्र लीडरशिप अवॉर्ड’ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे, ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचा गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड