शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सत्याला स्पर्शणारे साहित्य चिरंतन

By admin | Updated: December 7, 2015 00:00 IST

‘जिवंत माणसाची वेदना मांडण्याचे कसब लेखनाला जिवंतपणा बहाल करते, तसेच मानवी मनाला ज्ञानाचा, सत्याचा स्पर्श करणारे साहित्य चिरंतन असते,’

पिंपरी : ‘जिवंत माणसाची वेदना मांडण्याचे कसब लेखनाला जिवंतपणा बहाल करते, तसेच मानवी मनाला ज्ञानाचा, सत्याचा स्पर्श करणारे साहित्य चिरंतन असते,’ असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.एसकेएफ हॉल (चिंचवड) येथे शनिवारी बी.एम. देशमुखलिखित ‘असा वाहतो पाट’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ, मुंबईचे अध्यक्ष डॉ. प्रा. सोमनाथ रोडे अध्यक्षस्थानी होते. व्याख्याते राजेंद्र घावटे, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी जगताप, साहित्य संवर्धन समिती अध्यक्ष सुरेश कंक, सुरेश देशपांडे, डॉ. हंसराज बाहेती, लक्ष्मण उमराणी, धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे, शिवाजी चाळक, मधू जोशी उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘संस्कृतीतील विकृतीच्या जागा देशमुखांसारख्या संवेदनशील लेखकाला आव्हान देत असतात. मनाच्या तळाचा शोध घेणारी भाषाशैली हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.’’ प्रारंभी देशमुख यांनी मनोगतात सांगितले की, कलात्मक मूल्यांपेक्षा जाणिवेची मूल्ये मला जास्त महत्त्वाची वाटतात. घावटे यांनी साहित्य हे परिवर्तनवादी असायला हवे, असे मत मांडले. डॉ. प्रा. रोडे म्हणाले, ‘‘केवळ घोषणांनी क्रांती होत नाही, तर ती फक्त बलिदानातूनच होते. मनाची अस्वस्थता आणि बेचैनीतून जगण्याचे तत्त्व सापडते.’’ मनोज देशमुख, सविता इंगळे, शैलजा देशमुख, वर्षा बालगोपाल यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप गांधलीकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)