शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीला झळाळी

By admin | Updated: January 19, 2016 01:42 IST

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारी या कालावधीत पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत झाले. सारस्वतांचे हे संमेलन सर्वार्थाने उद्योगनगरीला झळाळी देणारे ठरले.

संजय माने, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरीयंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारी या कालावधीत पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत झाले. सारस्वतांचे हे संमेलन सर्वार्थाने उद्योगनगरीला झळाळी देणारे ठरले. संमेलनाच्या निमित्ताने राजकारण, समाजकारणातील, साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी शहराला भेट दिली. विविध विषयांवर विचारमंथन घडून आले. देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्य रसिक म्हणून लाखो नागरिकांनी हजेरी लावली. विकासाकडे झेपावणारी उद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या या शहराची चार दिवसांत अनेकांना जवळून ओळख झाली. शहराकडे सर्वांचे लक्ष वेधण्यास हे संमेलन निमित्त ठरले असून, शहराच्या पुढील उज्ज्वल वाटचालीचा मार्ग सुकर बनला आहे.हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्सच्या भव्य मैदानावर चार दिवसांचा सारस्वतांचा महामेळा दिमाखातपार पडला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापिठाचे डॉ. पी. डी. पाटील यांच्यामुळे शहरात हा सोहळा घडून आला.संमेलनस्थळाहून शहरात फेरफटका मारण्यासाठी महापालिकेने खास बससुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे संमेलनातील कार्यक्रम, चर्चासत्र याचा आस्वाद घेण्याबरोबर अनेकांनी महापालिकेच्या विविध प्रकल्पांना भेट दिली. सिंगापूर सिटीचा आभास व्हावा, असे चित्रण असलेली शहराच्या विकासावर दृष्टिक्षेप टाकणारी ध्वनिफित महापालिकेने संमेलनस्थळी दाखवली होती. त्यानंतर अनेकांना शहरातील प्रकल्पांना भेटी देण्याचा मोह आवरला नाही. दुर्गादेवी टेकडी उद्यान, झोपडीवासीयांचे पुनर्वसन प्रकल्प,मध्यमवर्गीयासाठी साकारलेला घरकुल प्रकल्प, ठिकठिकाणचे जलतरण तलाव, खाणीवर विकसित केलेली उद्याने, प्रेक्षागृह,सहल केंद्र, ध्यान केंद्र, ज्येष्ठ नागरिकांची विरंगुळा केंद्र, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी सक्षम यंत्रणा, भुयारी गटारे हे सर्व भेटी देणाऱ्यांसाठी थक्क करणारे होते. प्रकल्प पाहण्यासाठी फेरफटका मारताना दळणवळण सुविधेसाठी सक्षम ठरलेले उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर,प्रशस्त रस्ते हे अनुभव विकसित शहर आणि नागरी जीवन समृद्ध करण्यास पूरक असल्याचे अनेकांना मनोमन पटले. शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या प्रशासकीय आणि राजकीय व्यकतींनी या शहराच्या नियोजनबद्ध विकासाची नोंद घेतली.