शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

मरणानंतरही अवयवदानातून जिवंत राहता येतं : अवयवदानाबद्दल जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 6:38 PM

अवयवदानाबद्दल आजही अनेक गैरसमज असल्याने हे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे कित्येक गरजवंत अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देअवयवदान जनजागृतीसाठी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचा पुढाकारएका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात जणांचे प्राण वाचू शकतात.

रावेत : अवयवदान ही काळाची गरज आहे.लाखो रुग्णांना योग्य अवयव नसल्यामुळे आयुष्यभर अपंगत्वात जगावे लागते. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे मरणानंतर जिवंत राहण्यासाठी अवयवदान करणे आवश्यक आहे. हा धागा पकडून रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखीच्या परतीच्या प्रवासात अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यात आली. या प्रवासामध्ये १० जणांनी अवयवदान केले.अवयवदान जनजागृती मोहिमेत अध्यक्ष प्रदिप वाल्हेकर,  गणेश बोरा, सुभाष वाल्हेकर,  अ‍ॅड. सोमनाथ हरपुडे,  सचिन काळभोर,  संदीप वाल्हेकर,  सुनील कवडे, स्वाती वाल्हेकर, वसंत ढवळे, शेखर चिंचवडे, विनायक घोरपडे आदी उपस्थित होते. बिर्ला हॉस्पिटल आणि वात्सल्य दिव्यांग मुलांचे पुनर्वसन केंद्र संस्थेच्या सदस्यांनी यासाठी सहकार्य केले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने उद्या (गुरुवारी) अवयवदान मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड घेणार आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. अवयवदानाबद्दल आजही अनेक गैरसमज असल्याने हे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे कित्येक गरजवंत अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.प्रदीप वाल्हेकर म्हणाले, एखाद्या व्यक्तीने अवयवदानाचा निर्णय घेतला, तर त्यामुळे भविष्यात सात जणांचे प्राण वाचणार आहेत. सात जणांना या जगात आनंदाने राहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मृत्यूनंतर देखील जिवंत राहण्यासाठी अवयवदान करणे महत्वाचे आहे. शहरातील सर्व रोटरी क्लब आणि इतर संस्था मिळून गुरुवारी (दि. ९) अवयवदान जनजागृतीचा विक्रम करणार आहेत. त्याची नोंद लिंक बुक आॅफ रोकोर्डमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.......अवयवदान मोहिमेत सहभागी होण्यासाठी हे करा अवयवदान करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आॅनलाईन पद्धतीने देखील ते करता येणार आहे. त्यासाठी ६६६.ॅ्रा३ह्ण्राी.ूङ्म.्रल्ल या संकेतस्थळावर सुरुवातीला आपले नाव नोंदवावे लागेल. त्यानंतर अवयवदानाचा फॉर्म भरून अवयवदान मोहिमेत सहभागी झाल्याचे नोंदविण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु ही नोंदणी ९ आॅगस्ट (गुरुवार) या एकाच दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेतच करणं आवश्यक आहे.

टॅग्स :ravetरावेतSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा