शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासिकेतून स्वावलंबनाचे धडे

By admin | Updated: March 8, 2016 01:03 IST

शहरातील प्रामुख्याने झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी सेवा सहयोगी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

नीलेश जंगम, पिंपरीशहरातील प्रामुख्याने झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी सेवा सहयोगी संस्थेने पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक झोपडपट्टीमध्ये खोली भाड्याने घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावा म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणाचे धड दिले जात आहेत. खासगी शिकवणी लावणे सर्वच मुलांना परवडत नाही. झोपडपट्टीतील मुलांसाठी तर ही अशक्य गोष्ट आहे. त्यांनाही चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सेवा सहयोग संस्थेतर्फे मोफत अभ्यासिका उपक्रम तीन वर्षांपूर्वी सुरू केला होता. त्याची सुरवात पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यानगर, ओटास्कीम, गांधीनगर, फुलेनगर, काळेवाडी, थेरगाव या झोपडपट्टी भागात करण्यात आली. रोज सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत अभ्यासिका घेतली जाते. सुरुवातीला अवघे ५० विद्यार्थ्यांपासून अभ्यासिका सुरू करण्यात आली. आतापर्यंत तब्बल ४००० विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन बॅचमध्ये अभ्यासिकेबरोबर विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क वाढवून त्यातून त्यांना आरोग्य, स्वच्छता व स्वावलंबनाचे धडे दिले जात आहेत. त्यासाठी विविध विषयांतील तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी बोलविले जाते. या झोपडपट्टी व वसाहतीतील उच्चशिक्षित महाविद्यालयीन तरुणांना शिक्षक म्हणून प्राधान्याने संधी दिली जाते. प्रत्येक अभ्यासिकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थने एक समन्वयक नेमला आहे. वर्षातून तीन वेळा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. मुलांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी दर वर्षी सहलीचे व विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक अभ्यासिकेत व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यासाठी ३५० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. ग्रंथालयासोबतच विज्ञान उपक्रमांवरही संस्थेच्या माध्यमातून भर दिला जातो. यासोबतच प्रत्येक अभ्यासिका केंद्रावर संगणक प्रशिक्षण देण्यासाठी एक संगणक उपलब्ध केला आहे. विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे प्रशिक्षणही दिले जाते. दिवाळीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा महोत्सव घेतला जातो.