शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीही फिस्कटली

By admin | Updated: February 1, 2017 18:55 IST

आघाडीही फिस्कटली

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून युती आणि आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून राष्टÑवादीने काँग्रेसशी आघाडीचा निर्णय घेतला होता.  त्यानुसार गणेशोत्सवाच्या आरतीपासून याबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्टÑवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चेच्या पाच फेºया झाल्या.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असतानाही आघाडीबाबत निर्णय होत नसल्याने काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अस्वस्थ होते. सर्वांना आघाडी कधी होणार? किंवा काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता होती.  मात्र, जागांच्या संख्येवरून आघाडीची चर्चा थांबवली आहे. सुरूवातीला राष्टÑवादीने विद्यमान नगरसेवक, त्यांच्याकडे आलेले नगरसेवक असा फार्मुला मांडला होता. मात्र, त्यास काँग्रेसचा विरोध होता. 

महापालिका निवडणूकीसाठी १२८ पैकी पन्नास टक्के जागा द्याव्यात, अशी मागणी सुरूवातीला झाली. त्यानंतर पन्नास जागा, चाळीस जागा आणि तीस जागा अशीही मागणी केली. प्रभागांनुसारही चर्चा झाली. त्यामुळे याबाबत तोडगा निघेल असे वाटत असतानाच आघाडीची चर्चा थांबली आहे. मंगळवारी रात्री वाघेरे आणि साठे यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी जागांच्या संख्येवर चर्चा झाली. चाळीस जागांऐवजी वीसच जागा काँग्रेसला देऊ अशी भूमिका राष्टÑवादीने घेतली. त्यावर तीस तरी जागा द्या, अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र, वीस जागांपेक्षा अधिक जागा वाढवून देण्याची भूमिका राष्टÑवादीने घेतल्याने चर्चा थांबली. महापालिका निवडणूकीत जागांच्या मुद्यांवरून आघाडी होणार नसल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.

 

काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत चर्चेच्या पाच फेºया झाल्या. आम्ही सुरूवातीला ६४, त्यानंतर पन्नास, त्यानंतर चाळीस आणि शेवटी तीस जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस पक्षाला वीस जागा देणे हे अपमानास्पद आहे. राष्टÑवादी काँग्रेस भूतकाळीत रमलेली आहे. तिला वर्तमानाचे भान नाही. मतदारांना ग्राह्य धरले जात आहे. याचे उत्तर भविष्यात निश्चित मिळेल.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस

महापालिका निवडणूकीसाठी राष्टÑवादी आणि काँग्रेसची आघाडी होणे गरजेचे होते. त्यानुसार चर्चाही झाली. प्रभागांनुसारही चर्चा केली. चर्चेत आम्ही विद्यमान नगरसेवक आणि आमच्याकडे आलेले नगरसेवक एवढ्या जागा मागून वीस जागा काँग्रेसला सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे चर्चा थांबली आहे. सन्मानपूर्वक लढत होईल.