शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

अखेरची सलामी ६२ कोेटींची

By admin | Updated: January 4, 2017 05:23 IST

महापालिका निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जारी होऊ शकते, त्यामुळे विद्यमान सदस्यांच्या अधिकारातील स्थायी समिती सभेची आज शेवटची सभा होती.

पिंपरी : महापालिका निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जारी होऊ शकते, त्यामुळे विद्यमान सदस्यांच्या अधिकारातील स्थायी समिती सभेची आज शेवटची सभा होती. सायंकाळी सातपर्यंत स्थायीची सभा सुरू होती. स्थायी सदस्यांचा आणि अधिकारी-ठेकेदारांचा विषय मंजूर करून घेण्यासाठी रात्रीस खेळ सुरूच होता. शेवटच्या सभेत एकूण ६३ कोटींचे १८३ विषय मंजूर झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता जारी होऊ शकते. त्यामुळे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने विकासकामांचा धडाका लावला आहे. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीत अधिकाधिक विषय मंजूर करण्याचा धडाका लावला जात आहे. या पंचवार्षिकमधील विद्यमान सदस्यांची आजची शेवटची स्थायी समिती सभा होती. सभेची वेळ दुपारी अडीचची होती. मात्र, सायंकाळी पाच वाजेपर्यंत सभा सुरूच झाली नव्हती. तिसऱ्या मजल्यावरील स्थायी सभागृहात अधिकारी उपस्थित होते. मात्र, पदाधिकारी जागेवर नव्हते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बैठक सुरू झाली. विषयपत्रिकेवरील विषय अवघ्या काही मिनिटांत मंजूर केले. विषयपत्रिकेवर २१५ विषय होते. १४८ विषय मंजूर करण्यात आले. त्यामध्ये स्थापत्य, आरोग्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, उद्यान, झोपडपट्टी निर्मूलन, विद्युत विभागाचे विषय अधिक होते. तसेच अवलोकनाचेही विषय अधिक होते.(प्रतिनिधी)- सुरुवातीला सभेत विषयपत्रिकेवरील १४८ विषय मंजूर करण्यात आले. हे विषय काही मिनिटांत मंजूर करण्यात आले. ऐन वेळचेही अनेक विषय होते. विषयपत्रिकेवरील विषय मंजूर झाल्यानंतर काही सदस्य बाहेर पडले. त्यानंतरही सभा सुरूच होती. तर काही सदस्य तीनही मजल्यांवरील विविध विभागांतून आपापले विषय आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. सहा वाजल्यानंतरही काही सदस्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत होते. कार्यक्रमांकडे फिरविली पाठमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन होते. मात्र, दुपारनंतर स्थायी समिती सभेच्या सदस्यांनी त्याकडे पाठ फिरविली. एकीकडे शहरात विविध विकासकामांची उद्घाटने होत असताना स्थायी सदस्य मात्र, अधिकाधिक विषय मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. सायंकाळी सातपर्यंत सदस्य महापालिका भवनात घुटमळत होते.