शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

वायसीएमच्या रुग्णवाहिका मोजताहेत शेवटची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:34 IST

रुग्णांची गैरसोय : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्णवाहिकांची झाली दुरवस्था; दुरुस्ती होणार कधी?

पिंपरी : गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या रुग्णवाहिका शेवटच्या घटका मोजत आहेत. रुग्णवाहिकांमधील औषधोपचार पेटीची दुरवस्था, खराब झालेले दरवाजे, गंज लागलेला पत्र्याचा साठा, तुटलेल्या अवस्थेतील वायपर, सायरन, आॅक्सिजन किटचा अभाव अशा परिस्थितीत रुग्णांची ने-आण केली जात आहे. यामुळे, अत्यावश्यक रुग्ण नेताना रुग्णांचे नातेवाईक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

पिंपरी शहरातील वायसीएम रुग्णालयात खेड, मावळ, जुन्नर येथूनही अपघातग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात येते. परंतु, या रुग्णालयातील रुग्णवाहिकांची संख्या केवळ १० ते १२ असून, यामधील फक्त चार रुग्णवाहिका सुस्थितीत आहेत. या रुग्णालयाचा आवाका पाहता या ठिकाणी वीसहून अधिक रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. तसेच, ही वाहने महिनाभर धुतली जात नसल्याने रुग्णवाहिकेत दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिका विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करते.अत्याधुनिक रुग्णवाहिकांची आवश्यकतारुग्णवाहिकांमधून रात्री-अपरात्री रुग्ण नेले जात असल्याने सायरन, वायपर, औषधोपचार पेटी, उत्तम दर्जाचे सीट, चांगल्या प्रकारचे स्ट्रेचर उपलब्ध असणे आवश्यक आहे. वायसीएममधील सर्व रुग्णवाहिका जुन्यातील असून, एकही रुग्णवाहिका अत्याधुनिक नाही. यामुळे, एखाद्या रुग्णाला अत्यावश्यक स्थितीत आणताना मोठी कसरत करावी लागत आहे.