शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाची बैठक ठरली निष्फळ

By admin | Updated: February 6, 2017 06:08 IST

हिंजवडीची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नियोजित असलेल्या म्हाळुंगे ते हिंजवडी रस्त्याच्या बैठकीत शेतकऱ्यांना आपले मुद्दे मांडण्याची संधी

वाकड : हिंजवडीची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नियोजित असलेल्या म्हाळुंगे ते हिंजवडी रस्त्याच्या बैठकीत शेतकऱ्यांना आपले मुद्दे मांडण्याची संधी न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी एमआयडीसीने आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. यासह वेगवेगळ्या गावांतील शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्नही चर्चेला आल्याने मार्च महिन्यात पुन्हा स्वतंत्र गावनिहाय बैठका घेण्यात येणार आहे. या बैठकीस पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेश झगडे, एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी अभियंता सुधीर नागे, भूसंपादन अधिकारी स्नेहल बर्गे, पीएमआरडीएचे नियोजनकार व्ही.एम. खरवडकर यांच्यासह म्हाळुंगे, हिंजवडी व माणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. २००५ साली हिंजवडी ते म्हाळुंगे बाणेर रस्त्याचा आराखडा एमआयडीसीकडून बनविण्यात आला. त्यानुसार सुरूवातीला ४५ मीटर रूंदीचा रस्ता तयार करण्याचा प्रस्तावही एमआयडीसीने मंजूर केला. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या जमीनींवर रस्त्याचे आरक्षण टाकले त्या जमींनी शेतकऱ्यांनी बिल्डरांना विकल्या होत्या. याच दरम्यान एमआयडीसीने तयार केलेला प्रस्तावित रस्त्याचा आराखडा नगररचना विभागाकडे उपलब्ध नसल्याने अनेक बिल्डरांनी विकत घेतलेल्या जमीनींवरती टोलेजंग इमारती उभारल्या. हा रस्ता करायचा की नाही याबाबत एमआयडीसीपुढे मोठे आव्हान होते. एमआयडीसीच्या या कारभारामुळे तब्बल दहा वर्षे या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे.आता एमआयडीसीने पूर्वीचा प्रस्तावित रस्ता रद्द करून नव्याने ३६ मीटरच्या रस्त्याची आखणी केली आहे. मात्र, त्यास म्हाळुंगे, माण व हिंजवडीच्या बाधीत शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा रस्ता ३६ मीटर ऐवजी ३० मीटरचा करावा, म्हाळुंगेतील बाधीत शेतकऱ्यांना निवासी झोनप्रमाणे मोबदला द्यावा, व पुर्वीचे रस्त्याचे आरक्षण सातबारावरून काढून टाकावे, अथवा जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या नांदे म्हाळुंगे रस्त्याचे रूंदीकरण करावे, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. मात्र, प्रत्येक गावातील बाधीत शेतकऱ्यांची मागणी व समस्या वेगवेगळी असल्याने या बैठकीत गोंधळ उडाला. (वार्ताहर)