शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजारांच्या औषधांचा अभाव

By admin | Updated: November 26, 2015 00:51 IST

अल्प दरात जेनेरिक औषधविक्रीचे ‘जन औषधी’ स्टोअर येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) कंपनीने सुरू केले आहे.

पिंपरी : अल्प दरात जेनेरिक औषधविक्रीचे ‘जन औषधी’ स्टोअर येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) कंपनीने सुरू केले आहे. मात्र तेथे कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार, थायरॉईड, मनोविकार अशा दुर्धर आजारांवर औषधेच नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. येथे येऊन रिकाम्या हातांनी फिरावे लागते. तसेच, इतर आजारांवरील औषधांचा पुरवठा अनियमित असल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागतात. बाजारातील महागडी औषधे खरेदी करणे परवडत नसल्याने गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना औषधांअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. ऐपत नसल्याने औषधांअभावी अनेकांचा मृत्यू ओढविल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे रोखण्यासाठी गरीब, गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी केंद्र शासनाने येथील एचए कंपनी कॉलनीच्या प्रवेशद्वारावर गेल्या वर्षी जनऔषधी स्टोअर सुरू केले. स्टोअरमध्ये बाजारातील औषधांपेक्षा ५० ते ७० टक्के कमी किमतीने औषधे मिळतात. रक्तदाब, हृदयविकार, पोटाचे विकार, मधुमेह, तसेच सर्दी, खोकला, थंडी, ताप आणि टॉनिकची औषधे उपलब्ध आहेत. मात्र कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, थायरॉईड, मनोविकार अशा दुर्धर आजारावरील औषधे उपलब्ध नाहीत. ही औषधे मिळतील म्हणून राज्यभरातून रुग्णांचे नातेवाईक मोठ्या आशेने येथे येतात. गेल्या महिन्यात उस्मानाबाद येथील २० वर्षांच्या तरुणीसाठी कर्करोगाच्या औषधांसाठी तिचे पालक आले होते. तसेच, मराठवाड्यातून मूत्रपिंड विकारग्रस्त तरुणांचे वडील आले होते. येथे ती औषधे न मिळाल्याने ते बराच वेळ तेथे रडत बसले होते.स्टोअरमध्ये उपलब्ध औषधांचा साठा लवकर संपत असल्याने तो वेळेवर पुरविला जात नाही. त्यामुळे यादीतील औषधांसाठीही अनेकदा चकरा माराव्या लागतात. ‘लोकमत’ प्रतिनिधीसमोरच चिंचवड येथून एक जण वडिलांच्या मधुमेह आणि रक्तदाबाच्या औषधाची यादी घेऊन आला. स्क्रिप्टमधील ७ पैकी एकही औषध शिल्लक नव्हते. त्यांना माघारी जावे लागले.(प्रतिनिधी)केंद्र शासनाच्या एचएएल, आयडीपीएल, केएपीएल, आरएपीएल, बंगाल केमिकल या कंपन्या औषधांचे उत्पादन करतात. तेथील औषधे येथे उपलब्ध आहेत. कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार, थॉयरॉईड, मनोविकार या आजारावरील औषधे उत्पादित केले जात नसल्याने त्यांचा पुरवठायादीत समावेश नाही. खासगी कंपन्यांनी २० टक्के प्रमाणात जेनेरिक औषधे बनविण्याचा नियम आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी होत नाही. तसे झाल्यास नागरिकांना २० ते ३० टक्के स्वस्त दराने ती औषधे उपलब्ध होतील. सरकारच्या काही कंपन्यांत उत्पादन पुरेशा प्रमाणात होत नसल्याने पुरवठा मर्यादित आहे.- हेबती कांबळे, स्टोअर समन्वयक