शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांना चार महिने पगारच नाही

By admin | Updated: December 22, 2016 01:51 IST

तहसीलच्या कार्यक्षेत्रातील महसूल विभागात काम करणाऱ्या कोतवालांना चार महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही.

लोणी काळभोर : तहसीलच्या कार्यक्षेत्रातील महसूल विभागात काम करणाऱ्या कोतवालांना चार महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे शासकीय राजशिष्टाचारात चोख कामगिरी बजावणाऱ्या कोतवालांना नोटाबंदीच्या काळात पगाराची रक्कम न मिळाल्याने मात्र बुरे दिन आले आहेत. गावकामगार तलाठ्यांच्या गैरहजेरीत सर्व शेतकरी खातेदारांची कामे कोतवाल पार पडत असल्याने ग्रामीण भागात त्यांना मिनी तलाठी म्हणून ओळखले जाते. प्रशासनाकडून मासिक वेतन न मिळाल्यास मिनी तलाठ्यांना आंदोलन करावे लागेल, असे पुणे जिल्हा कोतवाल संघटनेने म्हटले आहे.पुणे जिल्ह्यात गौणखनिज वसुलीचे काम असो अथवा महसूल विभागातील स्थळपाहणी, आपत्कालीन परिस्थिती, पंचनामा, संगणकीकृत सात-बारा यामध्ये कोतवाल सातत्याने तलाठ्यांना मदत करीत असतात. अगदी मंत्र्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रोटोकॉलची जबाबदारीही कोतवाल इमानेइतबारे पार पाडतात. मात्र, पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ४३७ कोतवालांना पगारच न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोतवालांना त्वरित वेतन न दिल्यास प्रशासनच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा कोतवाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी दिली. (वार्ताहर)