शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे काम करताना सुरक्षिततेचे भान ठेवा

By admin | Updated: January 14, 2017 03:06 IST

विजेचे बहुतांशी अपघात हे सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे होतात. त्यामुळे विजेचे कोणतेही काम करताना सुरक्षिततेचे भान ठेवा,

बारामती : विजेचे बहुतांशी अपघात हे सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे होतात. त्यामुळे विजेचे कोणतेही काम करताना सुरक्षिततेचे भान ठेवा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी केले.विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महावितरण व विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या वतीने कविवर्य मोरोपंत नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इरवाडकर म्हणाले, बारामती परिमंडल अपघातमुक्त करण्यासाठी सर्व अभियंते, जनमित्रांनी प्रयत्न करावेत. विजेमुळे होणारे बहुतांश अपघात हे निष्काळजीपणा व समन्वयाच्या अभावामुळे होतात. त्यामुळे सर्वांनी सुरक्षा साधनांचा आवर्जून वापर करावा. विद्यार्थ्यांनी आपले कुटुंब व समाजात विद्युत सुरक्षेबाबत जागृती करावी.विद्युत निरीक्षक कार्यालयाचे शाखा अभियंता महेंद्र जगताप व निवृत्त उपकार्यकारी अभियंता श्रीपाद टाकळकर यांनी स्लाईड शोद्वारे विद्युत अपघाताची कारणे व उपाय यावर मार्गदर्शन केले. बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष धनंजय जामदार, अधीक्षक अभियंता केशव सदाकळे, सहायक महाव्यवस्थापक (मा. सं.) वामनराव जाधव यांचीही याप्रसंगी समयोचित भाषणे झाली. विद्युत निरीक्षक ना. ई. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अभियंता मधुकर घुमे यांनी आभार मानले. फेरेरो कंपनीच्या वतीने अभियंता सचिन पोंदकुले यांनी महावितरणच्या यंत्रचालकांसाठी ग्लोव्हज् दिले. मुख्य अभियंता इरवाडकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ते तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. सहायक विद्युत निरीक्षक डेकाटे, डायनामिक्स डेअरीज्चे विद्युत अभियंता दरेकर, महापारेषणचे कार्यकारी अभियंता प्रमोद भोसले, महावितरणचे कार्यकारी अभियंता संपतराव दबडे, केशव काळुमाळी, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) विजय गुळदगड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांच्यासह बारामती मंडलातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच माळेगाव महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी शाखेचे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)