पिंपरी : पिंपळे सौदागर येथील भिसे कॉलनीत तरुणांच्या टोळक्याने २४ फेब्रुवारीला तलवारीने केक कापून गोंधळ घातला होता. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी पाच जणांना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज खंडू काटे (वय २८, पिपंळे सौदागर), निरज काटे, रामदास धनवटे, गणेश धनवटे, अक्षय रासकर (रा. पिंपरी) यांना सांगवी पोलिसांनी बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अटक केली. त्यांना दुपारी पिंपरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. २४ फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता या आरोपींसह अन्य पाच ते सहा साथीदारांनी मित्राच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापला. यामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.शस्त्रबंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हामाहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अरुण पांडुरंग नरळे या पोलीस कर्मचाºयाने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. संबंधित तरुणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. पुणे शहर आयुक्तांनी शस्त्रबंदीचा आदेश दिला असताना, त्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नरळे यांनी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तलवारीने केक कापणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:40 IST