शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एकाच नावाने दोन संस्थांमध्ये नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:56 IST

काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी करीत असलेल्या आरोपीने पुण्यातील पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक शाळेतही नोकरी मिळवली.

पिंपरी : काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी करीत असलेल्या आरोपीने पुण्यातील पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक शाळेतही नोकरी मिळवली.एकाचवेळी दोन्हीकडे सेवेत राहून त्याने पगाराच्या रकमेपोटी २२ लाख ७५ हजार २२५ रुपये मिळविले. शासनाची त्याने फसवणूक केली. ही बाब माहीत असूनही शासनास न कळविल्यामुळे भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांच्यासह दहा जणांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या संस्थेचे महेंद्र बामगुडे (लिपिक), रवींद्र बामगुडे, नवनाथ देवकर (प्रभारी मुख्याध्यापक), संगीता पाटोळे , नवनाथ देवकर, उल्का जगदाळे, जयश्री पवार, रामदास जाधव, संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर यांच्याविरुद्ध वाकड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षणधिकारी पराग एकनाथ मुंडे यांनी पोलिसांकडे संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणासही अटक झालेली नाही.या बाबतची सविस्तर माहिती अशी, यातील प्रमुख आरोपी रवींंद्र नामदेव बामगुडे हा महेंद्र नामदेव बामगुडे नावाने भाऊसाहेब तापकीर विद्यालय काळेवाडी येथे लिपिक पदावर नोकरी करीत आहे. या संस्थेत तो कायमस्वरूपी नोकरीस असताना त्याने पुणे, पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक विद्यालय महापालिका शाळा क्रमांक ३१ मध्ये सेवक पदावर नोकरी मिळवली.एका संस्थेत कायमस्वरूपी नोकरी करीत असताना, दुसºया संस्थेला त्याबद्दल माहिती न देता, चुकीची माहिती देऊन त्याने शासनाचा दोन्ही संस्थांकडील पगार घेतला. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत त्याने शासनाची २२ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही बाब निदर्शनास आली.>संगनमताने अपहारभाऊसाहेब तापकीर विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब तापकीर, सचिव मल्हारी तापकीर तसेच तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक नवनाथ रामदास देवकर, उल्का रणजित जगदाळे तसेच संगीता पाटोळे, जयश्री पवार यांना ही बाब माहीत असूनही त्यांनी ती लपवली. शासनाला वेळीच माहिती देण्याचे टाळले. आरोपीने शासनाची फसवणूक केल्याचे हे कृत्य संस्थेच्या पदाधिकाºयांच्या संगनमताने अपहार झाला आहे. अशी फिर्याद शिक्षणाधिकाºयांनी दिल्यामुळे पोलिसांनी दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी