शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

जयंती महोत्सवात प्रबोधनावर भर हवा

By admin | Updated: March 28, 2017 02:26 IST

महापालिका आयोजित करीत असलेल्या जयंती महोत्सवात महामानवांच्या जीवनकार्याशी सुसंगत अशा प्रबोधनपर

पिंपरी : महापालिका आयोजित करीत असलेल्या जयंती महोत्सवात महामानवांच्या जीवनकार्याशी सुसंगत अशा प्रबोधनपर कार्यक्रमावर भर द्यावा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याही वर्षी महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दि. ११ ते १४ एप्रिल असा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असा संपन्न होत असतो. या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात मनोरंजनावर अधिक भर असतो. ‘विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले’ असा संदेश देणारे महात्मा फुले आणि ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश देणारे बाबासाहेब यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करीत असताना या दोन्ही महामानवांच्या या संदेशाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे वाटते. या महामानवांनी आपल्या जीवनकाळात सामाजिक समानतेचा घेतलेला ध्यास, स्त्री-पुरुष समानतेसाठी केलेले कार्य, शिक्षण प्रसाराची धरलेली कास, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक विषमतेविरुद्ध केलेला संघर्ष या सर्वांचा प्रभावी व परिणामकारक प्रसार होईल, असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. (प्रतिनिधी)सामाजिक प्रबोधनाच्या, विषमता निर्मूलनाच्या क्षेत्रात, तसेच सामाजिक क्षेत्रात प्रभावी व नि:स्वार्थपणे कार्य करीत असलेल्या शहरातील कार्यकर्त्यास डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. या दोन्ही महामानवांच्या नावाने मागासवर्गीय विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी. समाजातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात किमान एक अद्ययावत अभ्यासिका सुरू करण्यात यावी. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करणे त्यांना बऱ्याचदा अशक्य होते. अशा विद्यार्थ्यांसाठी अर्थसाहाय्य योजना सुरू करण्यात यावी.