शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:15 IST

आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे.

हिंजवडी : येथील आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे. सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे त्रस्त असलेल्या आयटी अभियंत्यांना वाहतूक विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे मोकळा श्वास घेणे शक्य झाले आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आयटी अभियंत्यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले.पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी हिंजवडी आयटी असोशिएशनच्या (एचआयए) पदाधिकाºयांसोबत मंगळवारी आढावा बैठक घेतली. अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, हिंजवडी विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक निरीक्षक किशोर म्हसवडे, एचआयएचे पदाधिकारी कर्नल भोगल, योगेश जोशी, टीसीएचे सचिन रत्नपारखी उपस्थित होते. आयुक्त पद्मनाभन यांनी ३ सप्टेंबरपासून हिंजवडी, वाकड परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी पाहणी केली. त्यानंतर अभियंते व स्थानिकांशी चर्चा करून एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला. यामुळे काय बदल घडून आला, हे जाणून घेण्याचा आयुक्तांनी प्रयत्न केला. स्थानिक ग्रामस्थ आणि आयटी अभियंत्यांच्या वाहतूक बदलाबाबत आणखी काही सूचना आहेत का, याचीही विचारणा बैठकीत केली.>आठ दिवसांत जाणवला फरकहिंजवडीत ३ सप्टेंबरपासून शिवाजी चौक ते विप्रो सर्कल, फेज १, फेज २ या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर चक्राकार एकेरी वाहतूक सुरू केली आहे. जागोजागी असलेले दुभाजक पंक्चर बंद केले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. नागरिकांच्या सूचनांची दखल घेऊन हा तात्पुरता बदल करण्यात आला. हिंजवडीतून वाकडकडे आणि वाकडहून हिंजवडीकडे जाणाºया मार्गावर होणाºया वाहतूककोंडीत आठ दिवसांत बराच फरक जाणवला आहे, अशा प्रतिक्रिया अभियंत्यांनी व्यक्त केल्या. अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, शहरात हिंजवडी हे देशातील महत्त्वाचे उद्योग केंद्र आहे. या आयटी हबमुळे पुण्याचे नाव जगाच्या पटलावर झळकत आहे. आयुक्तांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. बदल व्हावा ही फक्त पोलिसांची इच्छा असून उपयोग नाही, नागरिकांचे सहकार्य हवे आहे.’’