शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

आयटीनगरीत सापाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:37 IST

जगाच्या नकाशावर झळकणारी आयटीनगरी, हिंजवडी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. मात्र या वेळी हिंजवडीची चर्चा झाली ती येथील प्राणिमित्रांनी विषारी मण्यार जातीच्या सापाला जीवदान दिल्याने.

वाकड : जगाच्या नकाशावर झळकणारी आयटीनगरी, हिंजवडी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. मात्र या वेळी हिंजवडीची चर्चा झाली ती येथील प्राणिमित्रांनी विषारी मण्यार जातीच्या सापाला जीवदान दिल्याने. हिंजवडीलगतच्या मारुंजी गावात सुधीर बुचडे यांच्या बंगल्याच्या परिसरात बाटलीच्या टोपणात एक साप अडकला असून, सुटकेसाठी धडपडत असल्याचे वाइल्ड अ‍ॅनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीचे संघटक तुषार पवार यांना समजले. तो मण्यार जातीचा अतिविषारी आणि निशाचर सर्प असल्याचे निष्पन्न झाले.भक्ष्याच्या शोधात असताना तो रात्रीच त्या टोपणात अडकला असावा, असा अंदाज त्यांना आला. सर्पमित्र तुषार पवार, संस्थेचे सचिव शेखर जांभूळकर यांच्याकडे आले. संस्थेचे इतर सदस्य सूरज साखरे, ओंकार भूतकर, कृष्णा पांचाळ यांच्या सहकार्याने सापाची झाकणातून सुखरूप मुक्तता केली. हिंजवडी परिसरात सर्परक्षक म्हणून अध्यक्ष गणेश भूतकर, सचिव शेखर जांभूळकर, संघटक तुषार पवार, प्रकाश काकडे, सुमीत साखरे, उमेश काकडे, अमित साखरे, दीपक कांबळे, श्रीकांत काकडे हे पशू-पक्ष्यांना जीवदान देण्याचे काम सातत्याने करीत आहेत. प्राणिमात्रांवर दया करणे, त्यांना जीवनदान देणे हे आम्हा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. मण्यार हा निशाचर आणि अतिविषारी साप असल्याने त्याची सुटका करणे अत्यंत जोखमीचे काम होते. मात्र, अत्यंत चलाखीने आम्ही त्याला जीवदान देण्यात यशस्वी झालो, असे शेखर जांभूळकर यांनी सांगितले.या सर्वांनी इलेक्ट्रिक वायरिंगचा पाईप घेऊन त्यात सुरक्षितरीत्या सापाचे मुंडके पाइपमध्ये घातले. त्यानंतर त्याच्या शरीराच्या मधोमध अडकलेले टोपण उपलब्ध साधनांच्या साहाय्याने कापून काढले. कुठे जखम तर नाही ना हे तपासण्यासाठी त्याला मोकळे सोडले असता, तो सुसाट पळाल्याचे पाहून जखमी नसल्याची खात्री करून त्याला जंगलात सोडण्यात आले.

टॅग्स :snakeसापpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड