शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांनीच घेतल्या मुलाखती

By admin | Updated: January 3, 2017 06:28 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या. चिंचवड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या महापालिकेच्या १३ प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाच्या कार्ड कमिटीतील पुण्यातील वरिष्ठ नेत्यांपैकी कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांरी व प्रदेश कार्यकारणीवरील काही इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीत उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. थेरगाव येथील मोरया मंगल कार्यालयात सकाळी नऊपासून मुलाखत कार्यक्रमाचे नियोजन होते. प्रत्यक्षात अकराच्या सुमारास मुलाखती सुरू झाल्या. इच्छुक उमेदवार, तसेच त्याचे काही समर्थक अशा निवडक लोकांना मुलाखतस्थळी प्रवेश दिला जात होता. प्रभागातील मतदारसंख्या, समस्या, उमेदवाराचे प्रभागातील कार्य, जनसंपर्क या अनुषंगाने मुलाखतीत प्रश्न विचारले जात होते. मुलाखत घेण्यासाठी व्यासपीठावर बसलेल्यांपैकी काहीजण स्वत:च इच्छुक होते. कार्ड कमिटीचे सदस्य पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, माऊली थोरात, बाबू नायर, प्रमोद निसळ, सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, अमोल थोरात, महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, अमर मूलचंदानी, वसंत वाणी, रवि लांडगे, शैला मोळक, मनोज तोरडमल आदींच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या. (प्रतिनिधी)