शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांबूंच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 01:48 IST

बांबू हस्तकला केंद्राचे उद्घाटन : बांबूंच्या वस्तूंबाबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मत

पुणे : राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ येथे स्थापन केलेल्या बांबू हस्तकला व कला केंद्रांच्या माध्यमातून बांबूविषयक संशोधन व्हावे. इथे तयार होणाऱ्या बांबूच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह संत गाडगेबाबा व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील बांबू हस्तकला व कला केंद्राचे सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यावेळी उपस्थित होते.

सी. विद्यासागर राव म्हणाले, बांबूच्या वस्तूंच्या विक्रीची क्षमता प्रचंड आहे. स्वयंपाकघरात वापरावयाच्या वस्तू, घरांसाठी उपयोग असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे उपयोग आहेत. यामध्ये विद्यापीठांनी संशोधन केले आणि नावीन्यपूर्ण कल्पना लढवल्या तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी उलाढाल करणे शक्य आहे. ई-कॉमर्स साईट्सच्या माध्यमातूनही त्यांची विक्री व्हावी. अशा प्रकारे बांबू संशोधन केंद्रे ही ग्रामीण आणि आदिवासी व्यक्तींच्या विकासाची केंद्रे बनावीत. सध्या घरात फर्निचर करावयाचे असल्यास लोकांचा चीनकडे जाण्याचा ओढा असतो, मात्र बांबूच्या वस्तूंचा चांगला उपयोग करून घेतल्यास चिनी व्यावसायिकांना या वस्तूंसाठी महाराष्ट्रात यावे लागावे, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी.विकास खारगे यांनी सांगितले, पूर्वी बांबू हे लाकूड म्हणून गणले जात होते, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र राज्य शासनाच्या प्रयत्नांनंतर बांबूचा समावेश आता गवत म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे बांबूलागवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. करमळकर यांनी प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आभार मानले.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘बांबू ही कल्पवृक्ष असलेली प्रजाती आहे. जन्मापासून मरणापर्यंत माणसाला बांबूची उपयोगी पडतो. राज्य शासनाने प्रयत्नपूर्वक बांबू लागवडीवर भर दिल्यामुळे राज्यात त्याचे क्षेत्र ४ हजार ४६२ स्क्वेअरकिमी इतके वाढले आहे. बांबूमधून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतील.’’प्रावीण्य मिळविण्यासाठी कार्यक्रम आखावासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून माझ्या अनेक अपेक्षा आहेत. विद्यापीठाच्या सर्वच विभागांनी प्रावीण्य (एक्सलन्स) मिळवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड