शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हाईटकॉलर’साठी इच्छुक

By admin | Updated: February 3, 2017 04:19 IST

राजकीय पुढारी, नगरसेवकांसाठी ‘मसल’ पॉवर उपलब्ध करून देणाऱ्या गुंडांच्या अपेक्षा वाढल्या असून, महापालिका निवडणुकीत उतरण्याची अनेकांनी तयारी केली आहे

पिंपरी : राजकीय पुढारी, नगरसेवकांसाठी ‘मसल’ पॉवर उपलब्ध करून देणाऱ्या गुंडांच्या अपेक्षा वाढल्या असून, महापालिका निवडणुकीत उतरण्याची अनेकांनी तयारी केली आहे. ‘व्हाईटकॉलर’ होण्यासाठी ते विविध राजकीय पक्षांच्या आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष एकमेकांवर ‘गुंडांचा पक्ष’ असा आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत.महापालिकेत यापूर्वी निवडून आलेल्या आजी-माजी नगरसेवकांपैकी काहींची छायाचित्र अद्यापही विविध पोलीस ठाण्यात गुन्हेगारांच्या यादीत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचा वाढता आलेख दिसून येतो. राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला असल्याने अशाच व्यक्तींना प्राधान्यक्रम दिला जात आहे. गुन्हेगारांना राजाश्रयाची गरज भासते. राजकारणी मंडळी त्यांचा खुबीने वापर करून घेतात. गुंडांना ‘व्हाईटकॉलर’ म्हणून वावरण्याची संधी देण्यामध्ये राजकीय पक्षांचा पुढाकार आहे. नागरिकांनी नाराजी, संताप व्यकत केला तरी त्याची पर्वा न करता, राजकीय पक्ष अशा उमेदवारांना उमेदवारी देतात. राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार होण्याऐवजी शिरकाव करण्यास वातावरण तयार करून दिले जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे नगरसेवक यापूर्वी निवडून आले होते, त्यांचे गुन्हेगारी कारनामे नागरिकांना पाहायला मिळाले आहेत. नागरिकांच्या भावनेची कदर न करता, नगरसेवकांची संख्या कशी वाढवता येईल, या भूमिकेतून राजकीय पक्षांचे पदाधिकारी काम करीत असल्याने इच्छुकांमध्ये गुंडांची संख्या वाढली आहे. गुन्हेगारांना व्हाईटकॉलर म्हणून वावरण्यापासून रोखण्याचे काम राजकीय पक्षांकडूनच होऊ शकते. अशा व्यकतींना उमेदवारी नाकरून चांगल्या व्यक्तींना संधी दिली, तरच हे शक्य आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)गुन्हेगारांच्या नादाला कोण लागणार ? वर्षानुवर्षे राजकारण्यांबरोबर राहून त्यांची कामे करत असताना, आता गुंडांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून ते नगरसेवक होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना, सादर केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर ‘कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत’ असे नमूद करून मोकळे व्हायचे. कोणी आक्षेप घेतला तरच चौकशी होते, निवडणूक रिंगणातून बाद होण्याची शक्यता असते. परंतु, गुंडांच्या नादी कोण लागणार, अशी मानसिकता करून कोणी गुंडांच्या उमेदवारीबद्दल कोणीच आक्षेप घेत नाही? नेमका याचाच फायदा उठविण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे.